Home Breaking News तळजाई वसाहतीत अल्पवयीनाकडून पिस्टल जप्त; पुणे गुन्हे शाखा युनिट-२ची धडाकेबाज कारवाई

तळजाई वसाहतीत अल्पवयीनाकडून पिस्टल जप्त; पुणे गुन्हे शाखा युनिट-२ची धडाकेबाज कारवाई

73
0
पुणे | पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पुणे पोलीस गुन्हे शाखा युनिट-२ ने मोठी कारवाई करत विधीसंघर्षित (अल्पवयीन) बालकाकडून अग्नीशस्त्र जप्त केले आहे. तळजाई वसाहत, सहकारनगर परिसरात सार्वजनिक रस्त्यावर पिस्टल बाळगून उभ्या असलेल्या या अल्पवयीनाला पोलिसांनी अत्यंत सतर्कतेने ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून लोखंडी पिस्टल, मॅगझीन व एक जिवंत काडतूस असा एकूण ₹४०,४०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीवर अचूक कारवाई
दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट-२ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार योगेश मांढरे व उज्वल मोकाशी यांना गोपनीय बातमी मिळाली. त्यानुसार तळजाई वसाहत सहकारनगर येथील सार्वजनिक रोडवर पांढरा शर्ट व निळी जिन्स घातलेला एक इसम अग्नीशस्त्र बाळगून थांबलेला असल्याची माहिती मिळाली.
ही माहिती तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे यांना देण्यात आली. त्यांनी कायदेशीर कारवाईचे स्पष्ट आदेश दिल्यानंतर, युनिट-२ च्या पथकाने घटनास्थळी धाव घेत विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेऊन झडती घेतली.
गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी
चौकशीत समोर आले की, या अल्पवयीनावर यापूर्वीच
🔴 लोणीकाळभोर पोलीस स्टेशन व पुसेगाव पोलीस स्टेशन (जि. सातारा) येथे खुनाचा प्रयत्न
🔴 पर्वती पोलीस स्टेशन येथे वाहन तोडफोड
असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेसाठी हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे.
गुन्हा दाखल, तपास सुरू
या प्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे
गु.र.नं. ५३१/२०२५
शस्त्र अधिनियम कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शन
ही यशस्वी कारवाई
मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख,
मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे,
मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) श्री. विजय कुंभार
यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे यांच्या सूचनेनुसार पार पडली.
या मोहिमेत सपोनि अमोल रसाळ, कवठेकर तसेच पोलीस अंमलदार संजय जाधव, उज्वल मोकाशी, योगेश मांढरे, शंकर कुंभार, विनोद चव्हाण, शंकर नेवसे, विजयकुमार पवार, संतोष टकले, ओमकार कुंभार, नागनाथ राख, संदीप शिर्के, विशाल दळवी, अजीम शेख, सद्दाम तांबोळी यांचा समावेश होता.