पुणे शहरातील वाहतुकीचे शिस्तबद्ध नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून सतत कारवाई केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून, स्वारगेट चौक परिसरात आज वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोठी मोहीम राबविण्यात आली.
पोलीस उप आयुक्त कार्यालय (वाहतूक), पुणे शहर
या मोहिमेदरम्यान एकूण 324 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना यापुढे कठोर शिक्षा होणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

प्रमुख उल्लंघन आणि कारवाईचा तपशील
सिग्नल जम्पिंग: 46
अनधिकृत पार्किंग: 2
गणवेशात नसणे (रिक्षाचालक): 78
नो एंट्री मधून वाहन चालविणे: 10
भाडे नाकारणे: 48
जास्त प्रवासी नेणे: 97
पोलीस इशारा न पाळणे: 16
आवश्यक कागदपत्रे नसणे: 5
फॅन्सी नंबर प्लेट: 5





