Home Breaking News खडक पोलिसांची मोठी कारवाई! दिड वर्षांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद

खडक पोलिसांची मोठी कारवाई! दिड वर्षांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद

पुणे शहरातील खडक पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण कारवाई करत दिड वर्षांपासून फरार असलेला कुख्यात सराईत गुन्हेगार आझिम ऊर्फ पल्ला सलीम शेख (वय २४, रा. लोहियानगर, पुणे) याला अखेर अटक करण्यात यश मिळवले आहे.
या आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, घरफोडी, दुखापत, आणि शस्त्र बाळगणे अशा स्वरूपाचे एकूण सहा गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. खडक पोलीस ठाण्यातील गु.र.नं. २२३/२०२४ भा.दं.वि. कलम १०९, ११५(२), १३१, ११८(१), १८९(२), १९१(२), १९०, तसेच आर्म अॅक्ट कलम ४(२५) आणि म.पो. अधि.क. ३७(१)(३), १३५ अंतर्गत हा गुन्हा दाखल होता.
पोलीस दलाच्या तपास पथकाने दीर्घ काळ विविध भागात शोधमोहीम राबवूनही आरोपी हाताशी लागत नव्हता. मात्र, पोलीस अंमलदार आशिष चव्हाण आणि ईरफान नदाफ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी कोंढवा परिसरात बनावट नावाने राहत आहे.
तत्काळ सापळा रचून पोलिसांनी त्याला पकडले आणि २७ ऑक्टोबर २०२५ रोजी अटक करण्यात आली. ही कारवाई अत्यंत धाडसी आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली.
या संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ १) श्री. कृषिकेश रावल, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (फरासखाना विभाग) श्री. साईनाथ ठोंबरे यांनी केले. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत चव्हाण, निरीक्षक (गुन्हे) श्रीमती शर्मिला सुतार, निरीक्षक (गुन्हे) श्री. मनोजकुमार लोंढे, आणि सर्व्हेलन्स पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे यांनी उल्लेखनीय भूमिका बजावली.
या यशस्वी कारवाईमुळे पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षमता आणि जनतेच्या सुरक्षेप्रती असलेली बांधिलकी सिद्ध केली आहे. नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करत या कारवाईचे स्वागत केले आहे.