Home Breaking News पुण्यात मोठी ड्रग्स कारवाई: मेफेड्रॉन विक्री करणारा २५ वर्षीय आरोपी जेरबंद

पुण्यात मोठी ड्रग्स कारवाई: मेफेड्रॉन विक्री करणारा २५ वर्षीय आरोपी जेरबंद

42
0
पुणे शहरातील अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेने मेफेड्रॉन (एम.डी.) विक्रीत गुंतलेल्या २५ वर्षीय आरोपी मुजम्मील वाजीद खान याला खडक परिसरात जेरबंद केले आहे. ही कारवाई दि. ०२/०९/२०२५ रोजी पोलीस पेट्रोलिंग दरम्यान करण्यात आली.
पोलिसांनी खडक पुणे येथील नशेमन बिल्डिंग समोर एका ऑटो रिक्षामध्ये आरोपी व त्याचा साथीदार बसलेले होते, त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीचा साथीदार पळून गेला, मात्र मुजम्मील वाजीद खान याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून २६ ग्रॅम ६९ मिलीग्रॅम मेफेड्रॉन, ५,३३,८००/- रुपये रोकड, दोन मोबाईल फोन आणि १,५०,०००/- रुपये किमतीची ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली.
सदर आरोपीने पोलिसांना सांगितले की, मेफेड्रॉन विक्रीसाठी त्याचा साथीदार त्याला दिला होता. या प्रकरणी एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २२(ब), २९ अन्वये खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे पोलिस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त, सहायक पोलीस आयुक्त आणि अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदारांच्या टीमद्वारे करण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, अनिल सुरवसे, उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, अंमलदार विशाल दळवी, मारुती पारधी, नागनाथ राख, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, संदिप शिर्के, विनायक साळवे, सर्जेराव सरगर, सुहास डोंगरे, दयानंद तेलंगे, विपुन गायकवाड, दत्ताराम जाधव, रेहाना शेख, पोलिस उप निरीक्षक कांबळे आणि अंमलदार पांडुळे सहभागी होते.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की संदिग्ध व्यक्ती व ड्रग्सच्या व्यवहाराबाबत तत्काळ पोलीस संपर्क साधावा, तसेच शहरातील सुरक्षिततेसाठी सजग राहावे.