Home Breaking News फुरसुंगी येथील मिळकतीबाबतचा दस्त गहाळ आणि कुलमुखत्यार रद्द – नागरिकांनी सतर्क राहावे!

फुरसुंगी येथील मिळकतीबाबतचा दस्त गहाळ आणि कुलमुखत्यार रद्द – नागरिकांनी सतर्क राहावे!

पुणे शहरात जमीन व्यवहारांबाबत वारंवार होणाऱ्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची नोटीस जाहीर करण्यात आली आहे. आमचे अशील श्री. कुणाल राजेंद्रसिंग राजपुत यांच्या माहितीनुसार, दिनांक १९/०३/२०२५ रोजी त्यांनी श्री. आकाश बसंत वाल्मिकी आणि इरशाद अबरार शेख यांना दिलेला कुलमुखत्यारपत्र दस्त हवेली क्र. २, दस्त क्र. ७२४०/२०२५ अन्वये विधिवत नोंदणी करण्यात आला होता. मात्र, वैयक्तिक कारणास्तव हा कुलमुखत्यार दस्त दिनांक ०७/०८/२०२५ रोजी रद्द करण्यात आलेला आहे.
त्यानुसार, दिनांक ०८/०८/२०२५ पासून या दस्ताअंतर्गत कोणालाही कुठल्याही प्रकारचा व्यवहार करण्याचा अधिकार राहिलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा व्यवहारात सहभागी होण्यापासून सावधगिरी बाळगावी, अन्यथा उद्भवणाऱ्या वाद-विवादांसाठी आमचे अशील श्री. राजपुत जबाबदार राहणार नाहीत.
मिळकतीचे वर्णन :
मौजे फुरसुंगी, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्वे क्र. १९६, क्षेत्रफळ एकूण ०५ हे ३३ आर पैकी ०० हे ०२ आर.
पूर्वेस – राठोड यांची मिळकत
दक्षिणेस – दत्तात्रय सोनवणे व शेख यांची मिळकत
पश्चिमेस – सामाईक रस्ता
उत्तरेस – विठ्ठल सीताराम कोंडाळकर यांची मिळकत
ही नोटीस प्रसिद्ध करून संबंधित सर्वांना सूचित करण्यात येत आहे की, पुढील काळात जर कोणी या मिळकतीसंदर्भात कोणतेही दस्तऐवज अथवा व्यवहार केला, तर तो व्यवहार बेकायदेशीर मानला जाईल आणि त्याची जबाबदारी व्यवहार करणाऱ्यावरच राहील.
हा निर्णय व्यवहारांतील पारदर्शकता राखण्यासाठी आणि नागरिकांचे हित सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे. पुणे व परिसरातील नागरिकांनी या नोटीशीनुसार आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.