Home Breaking News खून, बलात्कार व ‘मोका’खालील फरार आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक!

खून, बलात्कार व ‘मोका’खालील फरार आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक!

76
0
पुणे शहरात गेल्या दोन वर्षांपासून विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आणि ‘मोका’ अंतर्गत घोषित आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातून फरार असलेल्या विशाल लक्ष्मण भोले (वय ३२, रा. दुष्काळ झोपडपट्टी, ताडीवाला रोड, पुणे) याला पोलिसांनी ३१ जुलै रोजी अटक केली.
आरोपीने फिर्यादी महिलेला खोटे सांगून लग्नाचे आमिष दाखवले. आपले आधीच लग्न झाले आहे हे लपवून फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. जेव्हा लग्नाबद्दल विचारणा झाली, तेव्हा आरोपीने तिला धमकावले, मारहाण केली व शिवीगाळ केली. यावरून बंडगार्डन पोलिसांत कलम ३७६(२)(एन), ३१३, ३२३, ४१७, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
तसेच आरोपी विशाल भोले याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खून, मोका, बलात्कार, संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, तसेच शस्त्रविषयक कायद्यांखाली गुन्हे दाखल आहेत. अनेक कलमांतर्गत गुन्ह्यांमुळे तो पुणे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला होता.
पोलिस उपायुक्त परिमंडळ २ श्री. मिलिंद मोहिते यांच्या सूचनेनुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार व त्यांच्या पथकाने अथक परिश्रम घेत आरोपीचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले.
ही यशस्वी कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त अतुल नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड, निरीक्षक निलकंठ जगताप, निरीक्षक संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
या कारवाईसाठी पीएसआय स्वप्नील लोहार, प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, अमित सस्ते, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकर, शिवाजी सरक, शिवाजी राणे या अधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. पुणे पोलिसांची ही कामगिरी अत्यंत स्तुत्य असून शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा मोठा दिलासा मानला जात आहे.