Home Breaking News मुंढवा परिसरात सशस्त्र गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांची तत्परता — हडपसर रेल्वे स्टेशन परिसरात...

मुंढवा परिसरात सशस्त्र गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांची तत्परता — हडपसर रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून अटक

97
0
पुणे  : मुंढवा पोलीस ठाण्याच्या गुन्हे तपास पथकाने धडक कारवाई करत एका २३ वर्षीय तरुणाला पिस्तुल व जिवंत राऊंडसह अटक केली आहे. हा प्रकार हडपसर रेल्वे स्टेशनजवळील किर्तनेबाग सार्वजनिक रस्त्यावर ३१ जुलै रोजी उघडकीस आला.
पोलीस अंमलदार विनोद सांळुके यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून तपास पथकाने तत्काळ सापळा रचत संशयितास अटक केली. आरोपीच्या अंगझडतीत १ देशी बनावटीचे पिस्तुल व १ जिवंत राऊंड सापडले. त्यानुसार त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम ३ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक आरोपीचे नाव:
🔹 राहुल संजय देटके, वय २३, रा. म्हसोबा वस्ती, मांजरी बुद्रुक, पुणे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मा. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ राजकुमार शिदे व सहा. पोलीस आयुक्त अनुराधा उद्दमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक राजु महानोर, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण, व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही धडक कारवाई केली.
🔸 शहरातील अशा सशस्त्र गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी ही मोहीम महत्वाची ठरली आहे.
🔸 गुन्हेगारांविरोधात झेरो टॉलरन्स पद्धतीने कार्यवाही होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने दिला आहे.
पोलीस प्रशासनाचे जनतेला आवाहन
“कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तात्काळ स्थानिक पोलिसांना कळवा. आपल्या सहकार्यामुळेच शहर सुरक्षित राहू शकते.”