वाघोली, पुणे – २४ जुलै २०२५ रोजी समृद्धी लॉज समोर, बकोरी फाटा वाघोली येथील महामार्गावर उभी असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सवर चार अनोळखी इसमांनी अचानक हल्ला चढवून चालक व वाहकाला जबर मारहाण केली. पैशांची मागणी करत त्यांनी जबरी चोरी करत खिशातील रोख रक्कम हिसकावली व घटनास्थळावरून चारचाकी गाडीतून पलायन केले.
या धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. यासंदर्भात वाघोली पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३६२/२५ भा.दं.वि. कलम ३०९(२), (६), ११५(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास पथकाने मिळवलेल्या गुप्त माहितीनुसार, पुढील आरोपींना अटक करण्यात आली: 1️⃣ साहील संतोष बवले (वय २२) 2️⃣ ओंकार सुरेश साकोरे (वय २१) 3️⃣ महेश विठ्ठल कवडे (वय २०) 4️⃣ नितांत चंद्रशेखर छपानी मोहन (वय २०)
या चौघांकडून रु. २,०७,०००/- किंमतीचा मुद्देमाल व चारचाकी वाहन हस्तगत करण्यात आले असून त्यांनी गुन्हा केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दाखवलेल्या दक्षतेमुळे हा गंभीर गुन्हा काही दिवसांत उघडकीस आला. यामध्ये अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ श्री. सोमय मुंडे, सहाय्यक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, पोउनि. मनोज बागल व तपास पथकातील पोलीस अंमलदारांनी अत्यंत चपळतेने कामगिरी बजावली.
या कारवाईमुळे परिसरातील ट्रॅव्हल्स चालक व प्रवाशांमध्ये पोलिसांबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघोलीसारख्या वाढत्या वसाहतीत पोलिसांच्या जलद हालचालींमुळे गुन्हेगारी रोखण्यासाठी आश्वासक उदाहरण तयार झाले आहे.