पुणे – शहरातील आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी मोठी चोरी उघडकीस आणली आहे. अवघ्या १९ वर्षांच्या तिघा तरुणांनी मिळून पुण्यातील आंबेगाव आणि भारती विद्यापीठ हद्दीतून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईत एकूण पाच मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या असून, याची अंदाजे किंमत दोन लाख रुपये इतकी आहे.
गुन्हेगारीच्या विळख्यात अडकलेले युवक – वय फक्त १९ वर्षे, पण हात धुवून चोरीच्या मागे!
नरेंद्र सुखदेव झुरंगे, सुयश सुनिल दुधाळ आणि प्रज्वल गंगाधर टिळेकर – हे तिघे आरोपी खळद (ता. पुरंदर) येथील रहिवासी असून त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून चार चोरीच्या मोटारसायकली आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली आणखी एक दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली.
पोलिसांची कारवाई आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत पथकाची कामगिरी उल्लेखनीय या यशस्वी कारवाईचे श्रेय जाते मा. अपर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त श्री. मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाला आणि आंबेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाच्या अथक परिश्रमांना. पोलिस उप-निरीक्षक मोहन कळमकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळेवर आणि चोख कारवाई करून मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे.
चार गुन्ह्यांचा पर्दाफाश – पुणे पोलिसांची गतीशील आणि परिणामकारक गस्त यंत्रणा पुन्हा एकदा सिद्ध! या प्रकरणात आंबेगाव पोलीस स्टेशनमधील १ आणि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमधील ३ असे एकूण ४ गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. गुन्हेगार कितीही हुशार असले तरी पुणे पोलिसांच्या चौकस नजरेतून सुटणे अशक्यच आहे!