हिंजवडी आयटी पार्क, चाकण-तळेगाव-माळुंगे औद्योगिक पट्टा तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांवरील ताण दूर करण्यासाठी आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) ला ‘सिंगल पॉइंट कोऑर्डिनेटर’ म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंदवार यांनी दिली असून, यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि यंत्रणांमध्ये एकत्रित समन्वय साधला जाणार आहे.
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आयुक्त आणि विविध संबंधित विभागांची उच्चस्तरीय बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत आयटी व औद्योगिक कॉरिडॉर मार्ग, ट्रक टर्मिनस, चौकांचे रुंदीकरण, रस्त्यांचे चौपदरीकरण, अपूर्ण ब्रिज बांधकाम, गायरान जमीन हस्तांतर अशा अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, चाकण असोसिएशनचे सदस्य तसेच संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस उपायुक्त (वाहतूक), पीडब्ल्यूडी, एनएचएआय, एमएसआरडीसी, एमआयडीसी, तळेगाव, चाकण व आळंदी नगरपरिषदा यांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत घेण्यात आलेले काही प्रमुख निर्णय:
PMRDA ला एकत्र समन्वयाची मुख्य जबाबदारी.
भूसंपादनासाठी निधी मिळवण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा.
नाशिक फाटा ते चाकण – ८ पदरी महामार्गाच्या कामाला वेग.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर DP रोड ३० मीटर रुंदीने विकसित करण्याचा निर्णय.
एनएचएआयने अतिरिक्त रुंदीकरणाचा प्रस्ताव मांडला.
२०५ भूमिपुत्रांच्या जमिनीचे तत्काळ संपादन व हस्तांतर.
चाकण चौकात इलेक्ट्रॉनिक टोल स्थलांतराची सुरुवात.
अंबेधन चौकातील पोल शिफ्टिंग ३० दिवसांत पूर्ण करणार.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता चौपदरी करण्याची प्रक्रिया गतीमान करणार.
८ दिवसांत खड्डे बुजवण्याची मोहीम.
मोई ते निगोजे ४५ मीटर रुंद रस्त्याचे काम सुरू होणार.
मोई ते चिखली पर्यंत रुंदीकरण व पूल बांधणीची मागणी.
महत्त्वाचे चौक रुंदीकरणासाठी चाकण असोसिएशनची मागणी – मोशी, आळंदी फाटा, गणेश साम्राज्य, स्पायसर चौक.
मोठ्या ट्रकच्या रस्त्यावर पार्किंगवर कठोर कारवाईचे आदेश.
चुकीच्या दिशेने पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई.
HPCL चौकात टँकर वाहतुकीवर मर्यादा.
गायरान आणि भांडारा टेकडीतील जमीन MIDC मार्फत ट्रक टर्मिनससाठी हस्तांतरित करणार.
चाकण आणि हिंजवडीसाठी स्वतंत्र समन्वय समिती स्थापन होणार.
पुणे जिल्ह्यासाठी ‘सरथी’सारखी मोबाईल अॅप यंत्रणा.
चार्होळी पुलालगत १८ मीटर रुंदीचा कनेक्टिंग रोड व इंद्रायणी नदीवर १२ मीटर रुंदीचा नवीन पूल – PMRDA कडून विकासाची मागणी.
या सर्व निर्णयांमुळे वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, औद्योगिक आणि आयटी पट्ट्यातील पायाभूत समस्यांवर निश्चितच लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. महायुती सरकारने ग्रामीण भागाची शहरी भागाशी जोडणी करण्यासाठी स्पष्ट कृती आराखडा तयार केला आहे.
✅ महत्त्वाकांक्षी कृती आराखड्याला गती! ✅ वाहतूक कोंडीतून मुक्तीच्या दिशेने भक्कम पाऊल! ✅ पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास!