Home Breaking News गुन्हेगारी विश्वातील मोठा फरार आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात!

गुन्हेगारी विश्वातील मोठा फरार आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात!

166
0
पुणे – बंड गार्डन पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या अत्यंत कौशल्यपूर्ण कारवाईतून विशाल लक्ष्मण भोळे या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या फरार आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे.

आरोपीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात MCOCA अंतर्गत नोंदवलेली खूनाची केस व बंड गार्डन पोलीस ठाण्यात बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो पोलिसांच्या नजरेआड होता.
गुप्त माहितीच्या आधारे धायरी-सिंहगड रस्त्याजवळून आरोपीला अटक करण्यात आली. पुणे गुन्हे शाखेच्या विविध युनिट्समधील समन्वयामुळे ही कारवाई यशस्वी झाली. पोलिसांनी या कारवाईत अत्यंत नियोजनपूर्वक व तत्परतेने काम करत पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठा धोका दूर केला आहे.
हा गुन्हेगार वर्षानुवर्षे पोलिसांपासून पळत होता, मात्र अखेर कायद्याच्या हातून सुटला नाही, हे सिद्ध झाले आहे.