Home Breaking News तुळशीबाग मंडळाचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष, पुण्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

तुळशीबाग मंडळाचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष, पुण्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

126
0
पुणे शहरातील मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट यांच्यावतीने शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम राबवला जात आहे.

रविवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नु. म. वि. शाळा, बाजीराव रोड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रुद्रांग वाद्य पथक, स्वरूप वर्धिनी, शिवमुद्रा, गजलक्ष्मी यांच्या सहकार्याने हा सामाजिक उपक्रम पार पडणार आहे.
या रक्तदान शिबिराद्वारे गरजूंना जीवनदान देण्याचा उद्देश असून “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. पुणेकरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक बांधिलकी जपण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. शतकोत्तर गौरव वर्षातील हा उपक्रम समाजप्रबोधनाचे एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे.