Home Breaking News डान्स बारवर छापा: अवैध व्यवहार, काली कमाईचा पर्दाफाश; बार मालकासह अनेक जण...

डान्स बारवर छापा: अवैध व्यवहार, काली कमाईचा पर्दाफाश; बार मालकासह अनेक जण अटकेत!

274
0
मुंबई – मुंबई परिसरात एका प्रसिद्ध डान्स बारवर पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत अवैध धंद्याचा मोठा भांडाफोड केला आहे. या कारवाईत बार गर्ल्सना बेकायदेशीर कृत्यात रंगेहाथ पकडण्यात आलं असून, मोठी रोकड रक्कम, सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात हवाला व्यवहार, बेकायदेशीर देयके आणि सेक्स रॅकेट चालवण्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या कारवाईत बार मालकासह व्यवस्थापक, काही ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
विशेष म्हणजे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, आणि मीरा रोड परिसरात अशाप्रकारच्या डान्स बारचे व्यवहार परत एकदा जोमात सुरू असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना मिळत होत्या. त्यामुळे यावर लक्ष ठेवत, गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली.
सध्या पोलीस जप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल फोन, अकाउंट बुक आणि रोख रकमेच्या व्यवहारांबाबत सखोल तपास करत आहेत. हवाला रॅकेट किंवा इतर आर्थिक गैरव्यवहार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नियमित स्वरूपात ड्राय डे अथवा बंदीच्या दिवशी देखील डान्स बार चालू असल्याचे अनेक पुरावे मिळाले असून, स्थानिक पोलिसांचीही भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.
या कारवाईमुळे पुन्हा एकदा चर्चेला आले आहे की, मुंबईत डान्स बार बंद झाले खरेच? की नव्या नावाने, नव्या पद्धतीने सुरू आहेत ‘काली कमाई’ची दुकानं?