Home Breaking News PF धारकांसाठी आनंदाची बातमी! आता डिजीलॉकरवर मिळणार EPFO च्या सुविधा; एकाच ठिकाणी...

PF धारकांसाठी आनंदाची बातमी! आता डिजीलॉकरवर मिळणार EPFO च्या सुविधा; एकाच ठिकाणी पासबुक, UAN कार्ड आणि इतर कागदपत्रं सहज उपलब्ध

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी सतत तांत्रिक सुधारणांची दिशा घेते आहे. आता आणखी एक मोठा बदल EPFO ने केला आहे – डिजीलॉकर (DigiLocker) वर PF संबंधित सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यामुळे पीएफ खातेदारांसाठी प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक झाली आहे.
यापूर्वी केवळ UMANG ॲप द्वारे काही सुविधा दिल्या जात होत्या, मात्र 17 जुलै रोजी EPFO ने सोशल मीडिया X (पूर्वीचं ट्विटर) द्वारे अधिकृतपणे सांगितलं की अँड्रॉइड वापरकर्ते आता डिजीलॉकरद्वारे EPFO शी संबंधित माहिती पाहू शकतात. सध्या हे अपडेट आयफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही, त्यांना UMANG ॲपवरच विसंबून राहावं लागेल.
डिजीलॉकरवर उपलब्ध EPFO ची महत्त्वाची कागदपत्रं :
UAN कार्ड
पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO)
EPF योजना प्रमाणपत्र
EPFO चे टॉप 5 डिजिटल उपक्रम जे तुमचं काम करणार आणखी सोपं :
डिजीलॉकरवरून थेट PF बॅलन्स तपासता येणार.
फेस ऑथेंटिकेशनद्वारे UAN अ‍ॅक्टिवेशन UMANG ॲपवर.
ऑनलाइन दावा सादर करून पैसे काढणे आता क्षणार्धात.
युनिफाइड पोर्टलवर ई-नामांकन आता फक्त काही क्लिकमध्ये.
OTP आधारित लॉगिन आणि ट्रॅकिंग सिस्टम आता स्मार्टफोनवर उपलब्ध.
ही सुविधा अशा खातेदारांसाठी वरदान ठरणार आहे, जे एकाच अ‍ॅपमध्ये त्यांच्या सर्व पीएफ संबंधित कागदपत्रांना प्रवेश मिळवू इच्छितात. हे केवळ वेळ वाचवणार नाही, तर प्रक्रिया सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक देखील करणार आहे.
याआधी फक्त उमंग अ‍ॅपवर पासबुक डाउनलोड करता येत होतं, परंतु आता डिजीलॉकरवरून देखील ते सहज आणि एका क्लिकमध्ये मिळू शकतं. ही एक डिजिटल क्रांती असून भारत सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेला चालना देणारी महत्त्वाची पायरी मानली जात आहे.
PF खातेदारांसाठी एक सल्ला – लवकरात लवकर तुमचा डिजीलॉकर अ‍ॅप अपडेट करा आणि EPFO सेवा सुरू करा.