पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीवर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी आता आक्रमक धोरण स्वीकारले आहे. याचाच एक भाग म्हणून पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे (परिमंडळ ५) यांच्या मार्गदर्शनाखाली ६ सराईत गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ अन्वये दोन वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे.
ही कारवाई केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, गुन्हेगारी प्रवृत्तीला थेट आव्हान देणारी आहे. दहशत, चोरी, हत्येचा प्रयत्न, बलात्कार, बेकायदेशीर हत्यारं, हातभट्टी दारू विक्री आणि सरकारी नोकरांवर हल्ले अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेले हे गुन्हेगार त्यांच्या गुन्हेगारी कारवायांमुळे अनेक वर्षे पोलीस रेकॉर्डवर होते.
तडीपार केलेले गुन्हेगार आणि त्यांचे गंभीर रेकॉर्ड:
पोलीस विभागाने सांगितले की, या तडीपार गुन्हेगारांनी तडजोड न करता जर पुन्हा शहर हद्दीत आढळल्यास पोलीस नियंत्रण कक्ष 112 किंवा संबंधित पोलिस ठाण्यास तत्काळ माहिती द्यावी.
या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आगामी सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची तयारी पूर्ण आहे. याशिवाय आणखी काही सराईत गुन्हेगारांवर मोका, एमपीडीए आणि तडीपार कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली.
जनवरी २०२५ पासून आजवर परिमंडळ ५ कडून १३ एमपीडीए, ९ मोका कारवाईत ५६ आरोपींना अटक आणि २५ जणांना तडीपार करण्यात आले आहे. एकूण ९४ सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाली आहे.
डॉ. राजकुमार शिंदे यांचे नागरिकांना आवाहन – “या गुन्हेगारांची पुनरागमन झाल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या. शहरात शांतता आणि सुरक्षिततेसाठी पोलिसांना सहकार्य करा.”