Home Breaking News ८ वर्षांपासून फरार असलेल्या घरफोडी गुन्हेगाराला पुणे पोलिसांची सर्जिकल स्ट्राईक! तीन आरोपी...

८ वर्षांपासून फरार असलेल्या घरफोडी गुन्हेगाराला पुणे पोलिसांची सर्जिकल स्ट्राईक! तीन आरोपी जेरबंद, गुन्हे शाखा युनिट ५ ची मोठी कारवाई

50
0
पुणे : पुणे शहरातील घरफोडी गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आणि पोलिसांच्या अभिलेखावर “पाहिजे” असलेल्या तिघा गुन्हेगारांना अखेर गुन्हे शाखा युनिट ५ च्या सतर्क पथकाने रामटेकडी, हडपसर परिसरातून अटक केली. विशेष बाब म्हणजे प्रमुख आरोपी बिरजुसिंग रजपुतसिंग दुधाणी हा तब्बल ८ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता, आणि आता तो अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.
गुन्हे शाखा युनिट ५ चे पोलीस निरीक्षक श्री. संजय पतंगे यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस अंमलदार नासेर देशमुख यांच्या महत्त्वपूर्ण बातमीवर कार्यवाही करत बिरजुसिंग दुधाणी (४०), करणसिंग दुधाणी (२८), आणि बिंतुसिंग कल्याणी (२८) यांना अटक करण्यात आली. हे तिघेही घरफोडी गुन्ह्यांमध्ये सक्रिय असून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यांमध्ये “पाहिजे” आरोपी होते.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या आरोपींपैकी बिरजुसिंग दुधाणी हा एकूण ४ गुन्ह्यांमध्ये फरार होता, आणि पोलिसांची दिशाभूल करत आठ वर्षे लपून राहत होता. त्याची हडपसर पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात देण्यात आली आहे, तर करणसिंग दुधाणीलाही त्याच पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. बिंतुसिंग कल्याणी यास विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात पुढील चौकशीसाठी देण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अंमलदार अविनाश इंगळे, शहाजी काळे, अमर चव्हाण, प्रशांत कर्णवर, नानासाहेब मोरे, राहुल ढमढेरे यांच्या सहकार्याने पार पडली.
 पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय की गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्याच्या हातांपासून दूर राहू शकत नाही!