Home Breaking News गडचिरोलीच्या औद्योगिक वाटचालीला नवे बळ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लॉयड्स मेटल्स...

गडचिरोलीच्या औद्योगिक वाटचालीला नवे बळ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी’च्या विविध प्रकल्पांचे कोनसरी येथे उद्घाटन

54
0
गडचिरोली | राज्यातील मागास व आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये औद्योगिकीकरणाचा नवा अध्याय लिहिला जात असतानाच, गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’च्या विविध औद्योगिक प्रकल्पांचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
या प्रकल्पांतून स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असून, जिल्ह्यातील आर्थिक घडी मजबूत होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. लोखंड, ऊर्जा, प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे गडचिरोली आता औद्योगिक नकाशावर ठळकपणे अधोरेखित होणार आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
“गडचिरोलीचा विकास बंदुकीच्या गोळ्यांपेक्षा प्रगतीच्या यंत्रांनी होणार आहे. या भागातील युवाशक्तीला रोजगार देणारे आणि स्थैर्य देणारे हे प्रकल्प आहेत. ही केवळ सुरुवात आहे. गडचिरोलीचा कायापालट करण्याचा आमचा संकल्प आहे.”
‘लॉयड्स मेटल्स’च्या या प्रकल्पांमुळे नवे तंत्रज्ञान, आधुनिक यंत्रसामग्री आणि पर्यावरणपूरक प्रक्रिया जिल्ह्यात येणार असून, यामुळे शाश्वत विकास साधता येईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
या उद्घाटन सोहळ्याला अनेक मान्यवर, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व उद्योजक उपस्थित होते. यामुळे कोनसरी आणि आसपासच्या भागात औद्योगिक गुंतवणुकीला मोठा चालना मिळणार आहे.