पुणे – पुण्यातील अखिल म्हसोबा मंडई ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही “धार्मिकतेथून विधायकतेकडे” या संकल्पनेतून भव्य सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 22 जुलै ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमाची आज पुणे शहराचे पोलीस आयुक्त मा. अमिनेश गुप्ता सर यांच्या हस्ते विधिवत सुरुवात झाली.
कार्यक्रमाची सुरुवात श्री म्हसोबा दैवताच्या पूजन व आरतीने करण्यात आली. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत गरजेचे असलेले वह्या, पुस्तके, पेन, ड्रॉइंग सामग्री अशा शैक्षणिक साहित्याचे पूजन करून ते पुणे विद्यार्थी व सतीगृहातील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
या वेळी सदगुरू परमपूज्य मनोहर मामा भोसले यांचे शुभाशीर्वाद लाभले. त्यांचे पाद्यपूजन सन्मानपूर्वक पार पडले. या पवित्र प्रसंगी उपस्थितांनी भावपूर्णतेने श्री श्री म्हसोबा दैवताचे दर्शन घेतले आणि कार्यक्रमा विषयी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक अनिल व अनघा दिवाणजी यांनी कसबा संस्कार केंद्र, पुणे परिवाराच्या वतीने हे आयोजन यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या पुढाकारामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची खरी मदत झाली आहे.
कार्यक्रमात अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. अशा विधायक उपक्रमांमुळे समाजामध्ये नवचैतन्य निर्माण होत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
हायलाइट्स ✅ धार्मिकतेतून सामाजिकतेकडे विधायक पाऊल ✅ गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य ✅ पोलीस आयुक्तांच्या हस्ते शुभारंभ ✅ सदगुरू मनोहर मामा भोसले यांचे आशिर्वाद ✅ कसबा संस्कार केंद्राचे मोलाचे योगदान