Home Breaking News मराठी तरुणीला परप्रांतिय तरुणाकडून अमानुष मारहाण; कल्याणमध्ये संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल

मराठी तरुणीला परप्रांतिय तरुणाकडून अमानुष मारहाण; कल्याणमध्ये संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल

30
0
कल्याण, ठाणे: कल्याणमधील एका व्यावसायिक संकुलात काम करणाऱ्या मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला एका परप्रांतीय तरुणाकडून सार्वजनिक ठिकाणी मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
ही घटना कल्याणमधील एका नामांकित बिल्डिंगमधील रिसेप्शन भागात घडली. मारहाण करणारा परप्रांतिय तरुण अचानकपणे त्या मराठी तरुणीवर धावून गेला आणि तिच्या चेहऱ्यावर जोरदार मारहाण केली. या घटनेमुळे त्या परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे परिसरातील काही लोकांनी केवळ व्हिडिओ शूट केला, पण मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. सध्या संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिस यंत्रणा सक्रिय झाली असून आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणीवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या मानसिक धक्क्यामुळे ती अत्यंत अस्वस्थ आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनने आरोपीला तात्काळ अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
राज्यातील महिला सुरक्षा, विशेषतः मराठी तरुणींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.