हिंमत, जोश आणि निडरपणाचे दर्शन घडवत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली. स्थानिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काही बॅनर फाडण्यात आले, पत्ते उधळण्यात आले आणि वातावरण तापवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, छावा संघटनेच्या ठाम उपस्थितीमुळे विरोधी गटाचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.
विशेष म्हणजे, ‘दादा गटाचे’ एकही कार्यकर्ते प्रत्यक्ष मैदानात उतरले नाहीत. छावा संघटनेच्या जोशात, त्यांच्याशी थेट पंगा घेण्याची कोणाचीच हिंमत झाली नाही. हा प्रकार पाहून स्थानिक नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं असून, “छावा म्हणजे नुसतं नाव नाही, तर झंझावात आहे,” असे बोलले जात आहे.
कार्यकर्त्यांनी केवळ आपली उपस्थितीच नव्हे, तर शिस्तबद्ध आणि मुद्देसूद प्रतिक्रिया देत संयमाचेही उदाहरण घडवले. त्यामुळे यापुढे कुणीही छावाविरुद्ध उगाच शौर्य गाजवण्याचा प्रयत्न करणार नाही, अशीच प्रतिक्रिया उमटली.