(दि. २१ जुलै २०२५) – ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या कसबा मतदारसंघाच्या सौंदर्यीकरणाला आता नवीन उंची मिळत आहे. आमदार हेमंत रासने यांच्या पुढाकाराने आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, “स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा” या अभियानाअंतर्गत तयार झालेल्या २२ ठिकाणी उभारलेल्या थ्रीडी शिल्प कलाकृतींचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमामध्ये मिशन अंतर्गत कसब्याचे क्रॉनिक स्पॉट्स (कचऱ्याचे व गोंधळाचे ठिकाणे) पूर्णपणे हटवून त्या जागांचे सुंदर सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि स्थानिक परंपरांशी सुसंगत थ्रीडी शिल्पकृतींनी रूपांतर करण्यात आले आहे.
या लोकार्पण सोहळ्याचे मुख्य आकर्षण 🔸 शुभहस्ते: श्रीमती माधुरीताई मिसाळ, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य 🔸 प्रमुख उपस्थिती: ▪️ श्री. नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका ▪️ श्री. अमितेश कुमार, आयुक्त, पुणे पोलीस
स्थळ: नागनाथ पार चौक, सदाशिव पेठ, पुणे दिनांक: २१ जुलै २०२५ वेळ: सकाळी ११:३० वाजता
हे थ्रीडी शिल्प नुसते सौंदर्यच नव्हे, तर इतिहास व संस्कृतीचा संगम आहेत. कसब्याचा प्रत्येक कोपरा आता एक कथा सांगेल, एक अभिमान वाढवेल.
आ. हेमंत रासने यांची प्रतिक्रिया “कसबा मतदारसंघ फक्त पुण्याचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे सांस्कृतिक हृदय आहे. या मोहिमेमुळे आमचा मतदारसंघ स्वच्छतेबरोबरच सौंदर्य, परंपरा आणि सामाजिक शिस्तीचे प्रतीक बनणार आहे. हे परिवर्तन नागरिकांच्या सहकार्याने आणि सरकारच्या संकल्पाने घडत आहे.”
जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांनी या उपक्रमाचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले असून, अनेकांनी सोशल मीडियावर या शिल्पांच्या फोटोसह आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“स्वच्छता हीच सेवा, आणि संस्कृती हीच ओळख!” – हेमंत रासने