महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. लातूर येथील विश्रामगृहात खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर जे काही घडले, ते अत्यंत धक्कादायक होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी तेथे आले आणि त्यांनी अलीकडील कृषीमंत्री यांच्या कृतीविषयी तटकरे यांना थेट जाब विचारला.
या चर्चेने वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले रोष प्रकट केला. मात्र यानंतर अजितदादा पवार यांच्या कार्यकर्त्यांनी या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर थेट हल्ला करत बेदम मारहाण केली. या प्रकाराने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
राजकारणामध्ये मतभेद असणे स्वाभाविक आहे, परंतु विरोधकांवर शारीरिक हल्ला होणे हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. महाराष्ट्रात यापूर्वी कधीच अशा स्वरूपाची घटना घडली नव्हती. या घटनेमुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली असून, पोलीस प्रशासनाकडून त्वरित कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
सध्या संपूर्ण लातूर जिल्ह्यात या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, छावा संघटनेने हा अपमान सहन न करता मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडून अद्याप या घटनेवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
लातूरच्या विश्रामगृहात पत्रकार परिषदेनंतरचा गोंधळ
छावा संघटनेने कृषीमंत्र्यांच्या कृतीवरून केला आक्षेप