पुणे :- हिंगोली जिल्ह्यातून बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी पुण्यात मिळून आली असून, तीला सुखरूप शोधून तिच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात पुणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. फरासखाना पोलीस स्टेशनच्या पथकाने तत्परता, दक्षता आणि संवेदनशीलतेने ही कामगिरी पार पाडली.
दिनांक ८ जुलै २०२५ रोजी, पुणे शहरातील रेड अलर्ट एरियामध्ये पायी गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाला दत्त मंदिराजवळ एक अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. नागरिकांच्या मदतीने आणि पोलीस मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत भस्मे यांना माहिती देण्यात आली.
यास अनुसरून पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे व अंमलदार गजानन सोनुने, रेखा राऊत, सारीका गुंजाळ आदींनी तातडीने घटनास्थळी जाऊन मुलीस विश्वासात घेऊन चौकशी केली. ती १६ वर्षांची ‘निर्भया’ असून हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाटा, ता. कळमनुरी येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. तिने सांगितले की, आई-वडिलांसोबत झालेल्या किरकोळ वादामुळे ती घर सोडून पुण्यात आली.
फरासखाना पोलिसांनी अखाडा पोलीस स्टेशन, हिंगोली येथे संपर्क साधून मुलीबाबत तपास केला असता, तिच्या बेपत्ता होण्याबाबत गु.र.नं. ४४८/२०२५ भा.दं.वि. १३७(२) नुसार गुन्हा नोंद झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्वरित हिंगोली पोलिसांशी समन्वय साधत, मुलीला तिच्या कुटुंबियांच्या व पोलिसांच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपूर्त केले.
या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व व मार्गदर्शन करणारे अधिकारी: 🔹 मा. अपर पोलीस आयुक्त – श्री. राजेश बनसोडे 🔹 मा. पोलीस उप-आयुक्त – श्री. कृषिकेश रावले 🔹 मा. सहाय्यक पोलीस आयुक्त – श्रीमती अनुजा देशमाने 🔹 वरिष्ठ पोलीस निरीक्षक – श्री. प्रशांत भस्मे 🔹 पोलीस निरीक्षक (गुन्हे) – श्री. अजित जाधव 🔹 सपोनि – उत्तम नामवाडे
कारवाईत सहभाग घेतलेले पोलीस व कर्मचारी: वैभव गायकवाड, गजानन सोनुने, रेखा राऊत, सारीका गुंजाळ, अनिता साबळे, मनिषा पुकाळे, अर्चना ढवळे, सोनाली भालेराव, पोलीस मित्र – तेजश्री कुपरे, प्रसाद बनसोडे, कार्तीक घोडेकर