Home Breaking News पुणे गुन्हे शाखेचा मोठा पराक्रम! ‘मोक्का’तील पाहिजे आरोपी संदीप केंदळे जेरबंद –...

पुणे गुन्हे शाखेचा मोठा पराक्रम! ‘मोक्का’तील पाहिजे आरोपी संदीप केंदळे जेरबंद – खंडणीप्रकरणातील फरार आरोपीला सोलापुरातून पकडले

पुणे : गुन्हेगारी नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-४ पथकाने एक मोठी कारवाई करत मोक्का अंतर्गत फरार असलेल्या संदीप गौतम केंदळे याला सोलापूरच्या कुर्डुवाडी येथून अटक केली आहे. आरोपीवर खंडणी, मारहाण, दहशत निर्माण करणे, शस्त्रबळाचा वापर आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत गंभीर आरोप आहेत.

गुन्ह्याचा तपशील :

▪️ गु.र. नं. ४८१/२०२४ – विमानतळ पोलीस ठाणे
▪️ गुन्ह्यांत अंतर्भूत कलमे :
➤ भादंवि कलम ३०८(४), १८९(२), १९१(२)(३), १९०, ३५२, ३५१(३)
➤ आर्म्स अ‍ॅक्ट कलम ४ (२५)
➤ क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम ७
➤ मोक्का कलम ३ (१)(ii), ३(२), ३(४)

अटक केलेल्या आरोपीची माहिती :

▪️ नाव : संदीप गौतम केंदळे
▪️ वय : ३८ वर्षे
▪️ रा. : एसआरए बिल्डिंग, विमाननगर, पुणे / सिध्दार्थनगर, कुर्डुवाडी, सोलापूर

अशी झाली कारवाई :

दिनांक २९ जून २०२५ रोजी पोलीस अंमलदार विनोद महाजन व नागेशसिंग कुंवर यांना गोपनीय बातमी मिळाली की, संदीप केंदळे कुर्डुवाडी येथे लपून बसलेला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथकाने सोलापुर गाठले. कुर्डुवाडी पोलीस ठाण्याच्या सहकार्याने सिध्दार्थनगर येथून आरोपीला अटक करण्यात आली.

पोलिसी पूछताछीदरम्यान आरोपीने दहा महिन्यांपूर्वी विमाननगर परिसरात खंडणी मागून मारहाण केली होती, अशी कबुली दिली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

कामगिरीतील पोलिस अधिकारी :

▪️ मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) – पंकज देशमुख
▪️ मा. पोलीस उप-आयुक्त (आर्थिक व सायबर गुन्हे) – विवेक मासाळ
▪️ मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे २) – राजेंद्र मुळेकर
▪️ युनिट-४चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक – अजय वाघमारे

✅ कारवाईत सहभागी पथक :

वैभव मगदुम, एकनाथ जोशी, प्रविण भालचीम, विनोद महाजन, संजय आढारी, नागेशसिंग कुंवर

पोलिसांचे आवाहन :

पुणे पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, गुन्हेगारीविरोधात सहकार्य करा, कोणतीही संशयास्पद व्यक्ती वा कृती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्या.