Home Breaking News पोलिसांच्या सापळ्यात सापडला सुनिल गायकवाड; २०२३ पासून पोलिसांच्या रडारवर असलेला गुन्हेगार गजाआड

पोलिसांच्या सापळ्यात सापडला सुनिल गायकवाड; २०२३ पासून पोलिसांच्या रडारवर असलेला गुन्हेगार गजाआड

209
0

पुणे – पुणे शहरात ‘मोका’ कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेल्या गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी अटक केली असून या यशस्वी कारवाईने गुन्हेगारी प्रवृत्तीला जबर दणका दिला आहे. सुनिल संजय गायकवाड (वय २०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो अटल १०, सच्चाईमातानगर, आंबेगाव खुर्द येथे राहतो.

गुन्ह्याचा तपशील :

संबंधित गुन्हा : भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, गु.र.नं. ७९८/२०२३

भा.दं.वि कलमे : ३९५ (दरोडा), ३२६ (गंभीर इजा), १४३, १४७, १४९, ५०४, ५०६(२)

क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम ७

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) कलम ३(१)(11), ३(२), ३(४)

अशी झाली कारवाई :

▪️ दि. १ जुलै २०२५ रोजी, पोलीस अंमलदार चेतन गोरे पेट्रोलिंग करत असताना, त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पाहिजे आरोपी सुनिल गायकवाड त्याच्या मित्राला भेटण्यासाठी घरी आला आहे.

▪️ वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्वरित त्या ठिकाणी धाव घेतली आणि सुनिल गायकवाड यास ताब्यात घेतले.

▪️ तपासादरम्यान त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्या विरोधात दरोडा, जबरी मारहाण, खंडणी, संघटित गुन्हेगारीचा सहभाग यांसारखे गंभीर आरोप आहेत.

पोलिस अधिकारी व पथक :

▪️ अपर पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग – श्री. राजेश बनसोडे
▪️ पोलीस उपआयुक्त, परिमंडळ २ – श्री. मिलींद मोहिते
▪️ सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग – श्री. राहुल आवारे
▪️ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आंबेगाव पोलीस स्टेशन – श्री. शरद झिने
▪️ पोलीस निरीक्षक (गुन्हे) – गजानन चोरमले

✅ कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी :

मोहन कळमकर, शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, सुभाष मोरे, हरिश गायकवाड, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते

पोलीस विभागाचे आवाहन :

▪️ “पाहिजे आरोपी, गुन्हेगार कोणताही असो, पोलिसांच्या टप्यातून सुटू शकत नाही.”
▪️ नागरिकांनी संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी.

“गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम, पुणे शहर सुरक्षिततेच्या दिशेने!”