Home Breaking News “न्यायाच्या सर्वोच्च शिखरावर नागपूरचा ठसा – सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या जिव्हाळ्याच्या शहरात...

“न्यायाच्या सर्वोच्च शिखरावर नागपूरचा ठसा – सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या जिव्हाळ्याच्या शहरात भावूक सत्कार!”

149
0

नागपूर – न्यायालयीन क्षेत्रातील सर्वोच्च पद भूषवणाऱ्या सरन्यायाधीश भूषण गवई यांचा नागपूर जिल्हा वकील संघटनेतर्फे भव्य सत्कार समारंभ नुकताच जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडला. या कार्यक्रमात सरन्यायाधीश गवई यांनी नागपूरच्या त्यांच्या वाटचालीतील योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि आपल्या न्यायालयीन कारकिर्दीच्या भावनिक आठवणी शेअर केल्या.

गवई म्हणाले, “दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनी आई-वडीलांसह दीक्षाभूमीवर येणं ही जणू श्रद्धेची परंपरा होती. वकिलीच्या आणि नंतर न्यायालयीन कारकीर्दीत नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हा वकील संघटना आणि नागपूर खंडपीठाने मला घडवलं. इथल्या अनुभवांनीच मला सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा प्रवास शक्य केला.”

 कार्यक्रमाचे विशेष क्षण:
▪️ त्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र अनावरण
▪️ तीन भाषांतील संविधान उद्देशिकेचे उद्घाटन
▪️ जिल्हा न्यायालयाच्या डिजिटल ग्रंथालयाचे ऑनलाइन उद्घाटन

कार्यक्रमाला सरन्यायाधीश यांच्या मातोश्री कमलताई गवई, पत्नी डॉ. तेजस्विनी गवई, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्या. प्रसन्न वराळे, न्या. अतुल चांदूरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, आणि नागपूर खंडपीठाचे न्या. नितीन सांबरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 न्यायमूर्ती गवई यांच्या भावपूर्ण विधानात:

“नागपूरच्या न्यायसंस्थांनी देशाला उच्च दर्जाचे न्यायाधीश व वकील दिले आहेत.”

“झुडपी जंगल प्रकरणात न्याय मिळवून गोरगरिबांना दिलासा देता आला, याचं समाधान आहे.”

“2001 मध्ये झोपडपट्टी हटविण्याच्या आदेशावर स्थगिती देताना हजारो नागरिकांचे घर वाचवू शकलो.”

“विधी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले.”

 प्रमुख मान्यवरांचे गौरवोद्गार:
न्यायमूर्ती वराळे, चांदूरकर, दत्तो आणि आराधे यांनी गवई यांच्या विनम्रता, सामाजिक बांधिलकी, आणि नीतिमूल्यांवर आधारलेले न्यायाधीशत्व यांचा गौरव केला.

आयोजन:
नागपूर जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. रोशन बागडे यांनी प्रास्ताविक तर सचिव मनिष रणदिवे यांनी आभार प्रदर्शन केले.