पुणे | आंबेगाव | पुण्यातील आंबेगाव आणि कात्रज परिसरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या आर.एम.डी, विमल गुटखा आणि सिगारेट विक्रीसाठी साठवून ठेवणाऱ्या किराणा दुकानदारांवर आंबेगाव पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ₹४९,९०० किंमतीचा गुटखा व सिगारेट जप्त केला असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
धडक कारवाईची ठळक वैशिष्ट्ये:
पोलिसांनी ४ ठिकाणी छापे टाकले – किराणा दुकाने व टपऱ्यांवर विक्रीसाठी साठवलेला गुटखा सापडला.
आरोपींनी महाराष्ट्र शासनाच्या बंदी आदेशाची पायमल्ली करून अवैध तस्करी व साठवणूक सुरू केली होती.
भा.दं.वि. कलम १२३, २२४, २७४, २७५ आणि FSSAI कायदा २००६ अंतर्गत गुन्हा दाखल.
अटक करण्यात आलेले आरोपी:
राहुल प्रकाश संचेती (३२)
प्रमोद प्रकाश संचेती (३६)
रविंद्र राजकुमार वाकडे (२६)
सुनिल दगडू सुरवसे (२४)
प्रशांत बच्चा कुलाल (४१)
हे सर्वजण आंबेगाव व कात्रज परिसरात अवैधरित्या गुटख्याचा साठा करून विक्री करत होते. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी व पथक:
या संपूर्ण कारवाईचे सूत्रसंचालन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, अंमलदार शैलेंद्र साठे, हनुमंत मासाळ, बाबासो पाटील, नितीन कातुर्डे व इतर २० पेक्षा अधिक अधिकाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन:
पुणे पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या परिसरात गुटखा विक्री होत असल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे. प्रतिबंधित पदार्थ विकणाऱ्या दुकानांची माहिती गोपनीय ठेवून पोलिसांनी कठोर कारवाई केली जाईल, असेही आश्वासन देण्यात आले आहे.