Home Breaking News हडपसर पोलिसांचे यशस्वी ऑपरेशन; चांदीचे २ लाखांचे दागिने जप्त, ४ गुन्ह्यांची उकल

हडपसर पोलिसांचे यशस्वी ऑपरेशन; चांदीचे २ लाखांचे दागिने जप्त, ४ गुन्ह्यांची उकल

पुणे शहरातील हडपसर परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली होती, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हडपसर पोलीस स्टेशनच्या सतर्क तपास पथकाने केवळ ३ विधिसंघर्षित बालकांना अटक करून थेट ४ घरफोडी प्रकरणांचा छडा लावला आहे.

दि. २ जून २०२५ रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना हडपसर पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड आणि त्यांचा तपास पथक संशयास्पद हालचाली करणाऱ्या तीन बालकांवर लक्ष ठेवून त्यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी विविध चार ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली.

 उघडकीस आलेले गुन्हे:

गु.र.नं. ५०२/२०२५ – कलम ३३१(४), ३०५, ३(५)

गु.र.नं. ५०८/२०२५ – कलम ३३१(१), ३०५(अ)

गु.र.नं. ४४०/२०२५ – कलम ३३१(३), ३३१(४), ३०५

गु.र.नं. ४९१/२०२५ – कलम ३३१(३), ३०५

 जप्त साहित्य:

या घरफोड्यांमध्ये वापरलेली साहित्य आणि एकूण २,००,०००/- रुपयांच्या किंमतीचे सुमारे २ किलो ५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

 पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी:

या यशस्वी कारवाईचे सर्व श्रेय जाते अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मा. श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय मोगले, व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे यांना.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड यांच्यासह २० पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही घरफोडी टोळी पकडून एक मोठा गुन्हेगारी साखळी तोडली.

 पोलीस प्रशासनाची जनतेस दिलेली ग्वाही:

“गुन्हेगार कोणताही असो, बालक असो वा प्रौढ, पुणे पोलिस त्याला सुसज्जतेने सामोरे जातील,” असे हडपसर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी नियमित पेट्रोलिंग व गुप्त माहितीचे जाळे अधिक बळकट करण्यात येणार आहे.