हडपसरमधील मांजरी परिसरात काही दिवसांपासून दहशतीचे सावट पसरवणाऱ्या गुन्हेगार टोळीला अखेर हडपसर पोलिसांनी शिताफीने अटक केली. लोखंडी हत्यारे व गावठी पिस्तूल घेऊन नागरिकांमध्ये भीती पसरवणाऱ्या या टोळीने थेट गोळीबार करत फिर्यादीच्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना २९ मे रोजी गार्गी एंटरप्रायजेसजवळ घडली होती. पोलिसांनी केवळ पुणेच नव्हे, तर शिरूरपर्यंत धडक कारवाई करत पाच जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे.
नेमकं काय घडलं? मांजरी बुद्रुकमध्ये आरोपी सुमित उर्फ विलास खवळे, वैभव गवळी व इतर चार अनोळखी युवकांनी बेकायदेशीर जमाव जमवून बंदुकीतून गोळी झाडली. लोखंडी हत्यारे घेऊन फिर्यादीच्या मुलावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्नही झाला.
हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ५०९/२०२५ नुसार खालील कलमांतर्गत गुन्हा दाखल:
भारतीय दंड संहिता कलम १०९, १८९(२)(४), १९०, १९१(२)(३)
आर्म्स अॅक्ट कलम ३(२५), ४(२५)
क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम ७
महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१)(३) सह १३५
आरोपींची नावे व पत्ते:
सुमित उर्फ विलास खवळे (वय २०) – सासवड रोड, सातववाडी
साहिल बाबुराव जगताप (वय २०) – घवाटे वस्ती, मांजरी
बसवराज विजय सुतार (वय २४) – केशवनगर, मुंढवा
वैभव श्रावण गवळी (वय २२) – केशवनगर, मुंढवा
सचिन गंगाराम रेनके (वय ३५) – इंदिरा नगर, शिरूर
शिरूरहून आणलेले गावठी पिस्तुल आरोपींकडून हस्तगत करण्यात आले, हे तपासाचे मोठे यश मानले जात आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तातडीची कारवाई:
अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) मा. श्री. मनोज पाटील
पोलीस उपायुक्त, परिमंडळ ५, डॉ. राजकुमार शिंदे
सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या सूचनांनुसार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले व पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला.
कारवाईतील पोलिसांची भूमिका: पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, आणि त्यांच्या चमूसह जवळपास १५ पोलिसांनी अत्यंत धाडसी व नियोजित पद्धतीने ही कारवाई पार पाडली.
जनतेच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर – हडपसर पोलीस हडपसर पोलिसांनी दाखवलेल्या दक्षतेमुळे मांजरी परिसरात पुन्हा शांततेचा श्वास घेता येत आहे. भविष्यातही अशा दहशतीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांची कार्यवाही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.