१८ वर्षांनी आरसीबीचा चॅम्पियन विजय, माजी मालक विजय माल्याने केलं अभिनंदन, पण सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घातलं ट्रोलिंगचे फटाके
प्रतिनिधी | मुंबई :- आयपीएल २०२५ च्या इतिहासात अखेर ते घडलं – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने पंजाब किंग्सला ६ धावांनी पराभूत करत पहिल्यांदाच आयपीएल चषक जिंकला. या ऐतिहासिक विजयाच्या जल्लोषात विराट कोहली, संघाचे खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि लाखो फॅन्स आनंदी होतेच, पण विशेष लक्ष वेधलं ते आरसीबीचे माजी मालक विजय माल्या यांच्या प्रतिक्रियेने.
विजय माल्याने आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलं,
“अखेर १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर RCBने आयपीएल ट्रॉफी उंचावली. जेव्हा मी RCBची स्थापना केली, तेव्हा हेच माझं स्वप्न होतं. विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूची निवड, ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्ससारख्या खेळाडूंचा प्रवास – हे सर्व आठवतंय. अखेर हे स्वप्न पूर्ण झालं!”
मात्र या आनंदाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी तुफान कमेंट्स करत माल्याला लक्ष केलं. काहींनी “तुमचं स्वप्न पूर्ण झालं, आता SBIचंही करा!” असा सल्ला दिला, तर काहींनी “सर, भारतात परत या आणि जनतेचा पैसा परत करा” असंही म्हटलं.
एका युजरने मजेशीर कमेंट करत लिहिलं,
“बँक बंद असताना ट्वीट कसं करता?” तर दुसऱ्याने लिहिलं, “कोहलीला शोधलंत, पण स्वतःचं ठिकाण आजपर्यंत कुणी शोधू शकलं नाही!”
RCBच्या विजयानंतर सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ सुरू असून, चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. माल्याचा ट्विट जितका भावनिक होता, तितक्याच ट्रोल्सही रोचक ठरल्या.
RCBसाठी हा विजय म्हणजे “ई साला कप नामदे” हे वाक्य खऱ्या अर्थाने साकार झालं. मात्र विजय माल्याच्या टाळ्या वाजवण्यापेक्षा नेटकऱ्यांना बँकेच्या रकमा वाजवल्या गेल्या, हेही तितकंच लक्षवेधी ठरलं.
ठळक मुद्दे : 🔹 RCBचा IPL इतिहासातील पहिला विजय – पंजाब किंग्सवर ६ धावांनी मात 🔹 विजय माल्याचं भावनिक ट्विट: “माझं स्वप्न पूर्ण झालं” 🔹 नेटिझन्सचा सडेतोड सवाल: “आता SBIचं स्वप्न पूर्ण करा” 🔹 सोशल मीडियावर माल्याचं ट्विट आणि त्यावर ट्रोल्सचा पाऊस 🔹 विराट कोहली, गेल, एबी डिव्हिलियर्सच्या कामगिरीला माल्याचा सलाम