Home Breaking News चिखलीतील लेबर कॅम्पमधील बेकायदा देशी दारू अड्ड्यावर पोलिसांचा धाडसत्र – आ. महेश...
चिखलीतील हॅरिझन आणि लेगसी रिव्हरसाईड सोसायट्यांच्या मागे असलेल्या या लेबर कॅम्पमध्ये सुमारे ३ हजार मजूर राहतात. येथे गेल्या काही महिन्यांपासून देशी दारूचे बेकायदेशीर दुकान चालवले जात होते. या दारू अड्ड्यामुळे सतत वादविवाद, गोंधळ, महिलांवरील अश्लील कमेंट्स, आणि दगडफेकसारखे प्रकार घडत होते. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांचा देखील सुरक्षिततेवर परिणाम होत होता.