Home Breaking News धुलिवंदन निमित्त पुणे मेट्रो सेवा काही तासांसाठी बंद

धुलिवंदन निमित्त पुणे मेट्रो सेवा काही तासांसाठी बंद

धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. १४) पुणे मेट्रोची सेवा काही तासांसाठी बंद राहणार आहे. महामेट्रोकडून प्रवाशांना सहकार्याची विनंती करण्यात आली आहे.

मेट्रो प्रशासनाच्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ६ ते दुपारी ३ या वेळेत दोन्ही मार्गांवरील मेट्रो सेवा बंद असेल. मात्र, दुपारी ३ ते रात्री ११ या वेळेत पुणे मेट्रोची सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

पुणे मेट्रो सध्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांवर सुरू आहे. दररोज सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत सेवा उपलब्ध असते. मात्र, धुळवडीच्या दिवशी स्वच्छता आणि सुरक्षेच्या कारणास्तव काही तासांसाठी ही सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन महामेट्रोकडून करण्यात आले आहे.