Home Breaking News विश्रांतवाडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! गुजरातपर्यंत पाठलाग करत लाखोंचा चोरीचा माल केला जप्त

विश्रांतवाडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! गुजरातपर्यंत पाठलाग करत लाखोंचा चोरीचा माल केला जप्त

88
0

पुणे शहराच्या गुन्हेगारी विरोधातील लढाईत विश्रांतवाडी पोलिसांनी पुन्हा एकदा आपली तडफदार कामगिरी सिद्ध केली आहे. इलेक्ट्रीक साहित्याने भरलेला टेम्पो चोरून नेणाऱ्या चोरट्याचा तपास करत पुणे पोलिसांनी थेट गुजरात राज्यात धडक मारली आणि आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली. तब्बल १८.६९ लाख रुपये किंमतीचा चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपशील

विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि.नंबर २३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या गुन्ह्याचा कसून तपास सुरू केला. पोलीस हवालदार संजय बादरे, पोलीस अमलदार अक्षय चपटे आणि पोलीस हवालदार संपत भोसले यांनी आपल्या गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून माहिती मिळवली की, हा गुन्हा औरंगाबाद येथील प्रशांत दिगंबर पाटील याने केला आहे आणि तो चोरीचा माल घेऊन विक्रीसाठी भरुच, गुजरात येथे गेला आहे.

गुन्हेगाराचा पाठलाग करत गुजरातपर्यंत धाव घेतली!

विश्रांतवाडी पोलीस पथकाने तातडीने गुजरातला जाण्याचा निर्णय घेतला आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. अखेर भरुच येथे मोठ्या शिताफीने आरोपीला पकडण्यात आले. आरोपीच्या ताब्यातून २.५० लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप आणि १६.१९ लाख रुपये किमतीचे इलेक्ट्रीक साहित्य असा एकूण १८.६९ लाख रुपयांचा चोरीचा माल जप्त करण्यात आला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पोलीस पथकाचा सिंहाचा वाटा

या संपूर्ण कारवाईत अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४ श्री. हिंमत जाधव, सहायक पोलीस आयुक्त (खडकी विभाग) श्री. विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश हांडे यांच्या सुचनेनुसार कामगिरी पार पाडण्यात आली.

यामध्ये पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाटे, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी अत्यंत शिताफीने आणि धाडसाने ही मोहीम पूर्ण केली.

विश्रांतवाडी पोलिसांचे कौतुक!

पोलिसांच्या या जलद आणि परिणामकारक तपासामुळे लाखोंचा चोरीचा माल वाचवण्यात यश आले. पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, गुन्हेगारांवर वचक बसला आह