Home Breaking News कुदळवाडीत महापालिकेची मोठी कारवाई! ५ दिवसांत ४६५ एकर भूभाग अतिक्रमणमुक्त

कुदळवाडीत महापालिकेची मोठी कारवाई! ५ दिवसांत ४६५ एकर भूभाग अतिक्रमणमुक्त

79
0

पिंपरी:- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) आणि पोलीस प्रशासनाने मिळून कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू केलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेत आजपर्यंत २,०५२८ अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली आहेत. गेल्या ५ दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या या मोहिमेत तब्बल ४६५ एकर भूभाग अतिक्रमणमुक्त करण्यात आला आहे.

५ दिवसांत लाखो चौरस फूट भूभाग मोकळा

महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या मोहिमेत अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे आणि भंगार दुकाने निष्कासित करण्यात आली.

आजच्या दिवशीच तब्बल ९३ एकर भूभागावर पसरलेल्या ४० लाख ५७ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या ५२८ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

महापालिकेच्या भव्य मोहिमेत मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाचा वापर

१६ पोकलेन
८ जेसीबी
१ क्रेन
४ कटर
६०० पोलीस कर्मचारी
१८० महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान
महापालिकेचे १६ उपअभियंते आणि ४ कार्यकारी अभियंते

याशिवाय, अग्निशमन विभागाच्या ३ गाड्या आणि २ रुग्णवाहिका सुरक्षेसाठी तैनात करण्यात आल्या होत्या.

सुरक्षिततेसाठी कडक पोलीस बंदोबस्त

महापालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या कारवाई करतानाच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष काळजी घेतली. या मोहिमेत पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्या अधिपत्याखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महापालिकेचा इशारा – अतिक्रमण हटवा, अन्यथा कठोर कारवाई!

महापालिकेने स्पष्ट केले आहे की, शहरातील नियोजित विकास आरक्षणे आणि नागरी सुविधांसाठी राखीव जागांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी ही मोहीम सतत सुरू राहील. बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.