Home Breaking News बिबवेवाडीत गोळीबार करून खुनाचा प्रयत्न; पोलिसांची तातडीची कारवाई, आरोपीची मिरवणूक काढून दहशतीला...

बिबवेवाडीत गोळीबार करून खुनाचा प्रयत्न; पोलिसांची तातडीची कारवाई, आरोपीची मिरवणूक काढून दहशतीला लगाम

90
0

बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या तात्काळ आणि कडक कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.

पोलिसांनी या आरोपीला अटक करताच त्याची धिंड काढून परिसरात दहशतीचे वातावरण नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या मुसक्या आवळताना पोलिसांनी त्याच्याकडून धारदार शस्त्र आणि गावठी कट्टाही जप्त केला आहे. हा आरोपी स्थानिक रहिवाशांमध्ये भीती पसरवण्यासाठी अनेकदा गुन्हेगारी कृत्ये करत होता, मात्र पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे त्याच्या दहशतीला पूर्णविराम मिळाला आहे.

बिबवेवाडी पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास सुरू केला असून, आरोपीच्या मागील गुन्हेगारी इतिहासाचा शोध घेतला जात आहे. तसेच, या गुन्ह्यात आणखी कोणी सामील आहे का, याचाही तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या वेगवान कारवाईचे कौतुक केले असून, अशा समाजविघातक तत्त्वांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.