गुन्हेगारी
कल्याणमधील रात्री नशा करणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड – कायद्याची कडक कारवाई!
कल्याण : कल्याण शहरात रात्री नशा करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. डीसीपी च्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले होते, ज्यांनी नशा करणाऱ्या आरोपींविरोधात कारवाई केली. या कारवाईत अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे, आणि मोठ्या प्रमाणावर मद्य व इतर नशेचे पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी रात्रीच्या वेळी कल्याणमधील विविध भागात कारवाई करत नशा करणाऱ्यांची धिंड...
नोकरीवरून काढून टाकल्याचा राग; चिंचवडमध्ये सुरक्षा रक्षकावर चाकू हल्ला! घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
पिंपरी-चिंचवड | २१ जून २०२५ :- पिंपरी चिंचवडमधील चिंचवड गावातील शांतीबन सोसायटीमध्ये एका सुरक्षा रक्षकावर थरारक चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदाम कामिठे (वय अंदाजे ५०) असे जखमी सुरक्षा रक्षकाचे नाव असून, राम लोंढे नावाच्या इसमाने हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘कसा घुसतोस?’ विचारल्यावर संतापला, थेट चाकूने हल्ला राम लोंढे नावाचा आरोपी शांतीबन सोसायटीमध्ये जबरदस्तीने प्रवेश...
पुण्यात भीक मागण्यासाठी अपहरण! २ वर्षीय चिमुकलीची पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत सुखरूप सुटका
पुणे – कात्रज येथील वंडर सिटी झोपडपट्टी मधून एका दोन वर्षाच्या चिमुकलीचा अपहरण करून तिचा वापर भीक मागण्यासाठी करण्याचा प्रयत्न समोर आला आहे. मात्र पुणे शहर पोलीस (भारती विद्यापीठ पोलिस आणि गुन्हे शाखा युनिट‑२) यांनी तत्काळ कारवाई करून चिमुकली सुरक्षितपणे धाराशिव जिल्ह्यातून मुक्त केली, त्याचबरोबर टोळीतील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटना आणि तपास २५ जुलै रोजी रात्री चिमुकली झोळीत...
साताराः २७ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाचा दावा करून मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न; भोंदूबाबाला पोलिसांनी घेतले ताब्यात
सातारा: माण तालुक्यातील शिंदी बुद्रुक गावात २७ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाचा दावा करून एका वृद्ध महिलेची मालमत्ता हडपण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दहिवडी पोलिसांनी एकनाथ रघुनाथ शिंदे (वय ५२, राहणार ओझर बुद्रुक, जामनेर, जळगाव) या भोंदूबाबाला अटक केली आहे. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपशील: शिंदी बुद्रुक येथील द्वारकाबाई विष्णू कुचेरकर यांचा मुलगा १९९७ साली, म्हणजेच...
पुण्यात शिक्षकाला ३२ लाखांचा ऑनलाईन घोटाळा; ‘नरेश गोयल प्रकरणात संशयित’ असल्याचा दावा करीत फसवणूक
पुणे: पुण्यातील हडपसर भागात राहणाऱ्या एका ५२ वर्षीय शिक्षकाला ऑनलाईन फसवणुकीचा शिकार करत तब्बल ३२ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. भामट्यांनी स्वतःला मुंबई पोलिस अधिकारी असल्याचे सांगून ‘जेट एअरवेज’चे संस्थापक नरेश गोयल यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुमचा सहभाग आहे’ असा आरोप करत शिक्षकाला धमकी दिली आणि मोठी रक्कम उकळली. घटनास्थळ: हडपसर, पुणे🔸 रक्कम: ₹३२ लाख🔸 फसवणुकीचा प्रकार: ऑनलाईन...
‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 2025’ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मॉडेल करिअर सेंटरसाठी ऐतिहासिक कराराचे हस्तांतरण!
पालघरमध्ये नव्या युगाचा प्रारंभ: मॉडेल करिअर सेंटर उभारणीला गती मुंबई, दि. 16: ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 2025’ या भव्य कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील स्टार्टअप आणि कौशल्य विकासाला नवी दिशा मिळाली आहे. पालघर येथील आयटीआयमध्ये उभारण्यात येणार्या ‘मॉडेल करिअर सेंटर’ संदर्भात भारतीय उद्योग महासंघ (CII) आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) यांच्यात ऐतिहासिक कराराचे हस्तांतरण करण्यात आले. कौशल्य विकासाच्या...
पुणे शहरातील तत्कालीन तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल!
पुणे: आर्थिक गुन्हे शाखेने पुणे शहरातील तत्कालीन तहसीलदार श्री. सूर्यकांत येवले आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर मोठी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात भूमी अधिनियमाचे उल्लंघन, बेकायदेशीर जमीन व्यवहार आणि शासकीय आदेशांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खडक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गु.र.नं. ५५२/२०२५ अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम २०१, ३६५(२), ३८५(३), ३८६(३), ३८८(४), ३३६(३), ३३८(४), ३८०(२), ६१(२), ३(४) या...
पुणे हादरले! प्रेयसीच्या मुलाचे अपहरण करून निर्घृण हत्या; आरोपीची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर.
पुणे : प्रेमातील विकृती आणि वैयक्तिक वादांमुळे प्रेयसीच्या मुलाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना आंबेगाव तालुक्यात घडली आहे. १२ वर्षीय आर्यन चव्हाण या विद्यार्थ्याचा मृतदेह २४ डिसेंबर रोजी संगमनेर जवळील राजापूर येथे एका कोरड्या विहिरीत आढळून आला. आरोपी राजेश रोहिदास जंबुकर याने आत्महत्या केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. घटनेचा तपशील: ११ डिसेंबर रोजी आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर...
पुण्यात खंडणीप्रकरणातील आरोपीला अटक; युनिट ५ गुन्हे शाखेची मोठी कामगिरी
पुणे: पुणे शहरातील गुन्हे शाखा युनिट ५ पथकाने पुणे ग्रामीणमधील खंडणीप्रकरणातील फरार आरोपीला अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. तब्बल काही महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या आरोपीला अखेर जेरबंद करण्यात आले आहे. घटनाक्रम दि. १२ मार्च २०२५ रोजी गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, रवी नरसिंग पवार (वय ४२, रा. लक्ष्मीनगर, हडपसर, पुणे) हा हडपसर इंडस्ट्रियल...
कायद्याचा अपमान की VIP संस्कृतीचा कहर? शिरूरमध्ये फॉर्च्युनरवर ‘लोकसभा सदस्य’ स्टिकर; कार्यकर्त्यास दंड नको, फोनवरच माफ!
शिरूर (पुणे): शिरूर शहरात नुकताच घडलेला एक प्रकार सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. सामान्य नागरिकांना नियम मोडल्यास तात्काळ दंड आणि एफआयआरचा सामना करावा लागतो, पण ‘विशेष व्यक्तींच्या’ कार्यकर्त्यांना मात्र केवळ एका फोन कॉलवर माफ केले जाते, ही बाब खरोखरच धक्कादायक आहे. गाडी क्रमांक MH43-BN-4545 ही एक आलिशान फॉर्च्युनर शिरूर परिसरात मिरवत होती. विशेष म्हणजे या गाडीवर 'भारतीय राजमुद्रा', 'सत्यमेव...

















