पुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत विकासकामांना वेग; ५४ किमी भुयारी मार्ग, अतिक्रमण निर्मूलन आणि वाहतूक सुधारणा यावर भर
पुणे : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची मानली जाणारी जिल्हा नियोजन समिती (DPC) बैठक आज उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रावहिनी पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील विविध पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, शासकीय योजना आणि प्रलंबित विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून विकासकामांना अधिक गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
पुणे पोलिसांची नवी पहल! पोलीस उप-आयुक्त स्वतः येणार ठाण्यांमध्ये – प्रलंबित तक्रारींवर थेट मार्गदर्शन | नागरीकांनी घ्यावी उपस्थिती
पुणे शहर पोलिसांकडून नागरिकांशी थेट संवाद वाढवण्यासाठी एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेने एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे, ज्यामध्ये पोलीस परिमंडळाचे उप-आयुक्त स्वतः पोलीस ठाण्यांमध्ये हजर राहून प्रलंबित गुन्हे व तक्रारी अर्जांच्या निपटाऱ्यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. पोलीस ठाण्यांना भेट देणार पोलीस उप-आयुक्त हा उपक्रम मंगळवार, २९ जुलै ते गुरुवार, ३१ जुलै २०२५ दरम्यान राबवण्यात येणार...
पॅरिस ऑलिम्पिक्समधील विजेत्यांचा सन्मान: पंतप्रधान मोदींच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार, भारताचे ऑलिम्पिक स्वप्न 2036 च्या दिशेने
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचा सत्कार त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी आयोजित केला. या ऑलिम्पिक्समध्ये भारताने 6 पदके जिंकून आपल्या सर्वोत्कृष्ट प्रदर्शनातील दुसरा सर्वोत्तम विक्रम नोंदवला. यात दोन पदके जिंकून इतिहास घडवणारी शूटर मनू भाकरही सहभागी होती, जिने पंतप्रधान मोदींना आपल्या यशामागील पिस्तूलाची माहिती दिली. इतर पदक विजेते शूटर सारबजोत सिंह आणि स्वप्नील कुसाळे...
संभल हिंसाचार: मशिद सर्वेक्षण विरोधातील हिंसाचारात ४ ठार, शाळा बंद, इंटरनेट सेवा स्थगित.
संभल, उत्तर प्रदेश, २५ नोव्हेंबर २०२४: मशिद सर्वेक्षणाच्या विरोधात उभ्या राहिलेल्या आंदोलनकर्त्यांनी पोलिसांशी उग्र संघर्ष केल्यानंतर उत्तर प्रदेशातील संभल येथे निर्माण झालेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला असून, २० पोलिस अधिकारी आणि अनेक नागरिक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर उपाययोजना राबवत शाळा, महाविद्यालये बंद केली असून इंटरनेट सेवा २४ तासांसाठी स्थगित केली आहे. प्रमुख घटना आणि घडामोडी: हिंसाचाराची...
“जय जवान जय किसान”चा संदेश देणारे लाल बहादूर शास्त्री हे देशासाठी दीपस्तंभ – उप आयुक्त अण्णा बोदडे
पिंपरी – “जय जवान जय किसान” ही क्रांतिकारी घोषणा देत संपूर्ण देशाला नवी दिशा देणारे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री हे केवळ थोर स्वातंत्र्यसैनिकच नव्हे, तर मूल्याधिष्ठित राजकारणाचे प्रतीक होते,” असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण...
राज्यातील वीज ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय! घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक वीज दरात ५ वर्षांत २६% कपात; मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली मोठी घोषणा
मुंबई | राज्यातील वीज ग्राहकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. महावितरणने सादर केलेल्या वीजदर कपातीच्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (MERC) ने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आगामी पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने वीज दरात तब्बल २६ टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे. पहिल्या वर्षातच ग्राहकांना १०% दर कपात मिळणार आहे. घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक या तिन्ही प्रकारच्या ग्राहकांना या निर्णयाचा थेट...
*”मुख्य मंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्तआमदार अमित गोरखे यांचे सामाजिक उत्तरदायित्व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांचे योगदान!”
*"मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमित गोरखे यांचे सामाजिक उत्तरदायित्व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांचे योगदान!"* मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा सन्मान करीत व त्यांच्या 'उत्सव नव्हे, उत्तरदायित्व!' या मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणादायी संकल्पनेनुसार आमदार श्री. अमित गोरखे यांनी एक सामाजिक बांधिलकी जोपासली. आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस...
जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत बैठक संपन्न
पुणे : नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत जिल्हा माहिती अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव युवराज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्यप्रणालीद्वारे माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात नगर विकास शाखेच्या प्रभारी जिल्हा सह आयुक्त अँलिस पोरे तर नगरपालिका व नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, उपविभागीय पोलीस...
संविधान दिनी पिंपरी चिंचवड महापालिकेत अभिवादन, सामूहिक प्रास्ताविक वाचन; ‘संविधानिक मूल्यांनुसार पारदर्शक प्रशासन’ — अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर
भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधत पिंपरी चिंचवड महापालिकेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्य प्रशासकीय इमारतीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. संविधान दिन हा लोकशाहीच्या प्रवासातील एक स्मरणीय टप्पा असल्याचे भासत होते, आणि या कार्यक्रमामध्ये संविधानातील मूल्यांना पुन्हा एकदा दृढनिश्चयाने स्वीकारण्याचा संकल्प करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त...
लोणावळ्यात विकासाचा नवा अध्याय सुरू होणार; जिल्हाधिकाऱ्यांचा पाहणी दौरा, रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास सोमवारपासून सुरूवात!
लोणावळा – पर्यटनाच्या नकाशावर ओळख निर्माण केलेल्या लोणावळा शहरात एक नवीन विकास पर्व सुरू होण्याच्या दृष्टीने गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक व पाहणी दौरा पार पडला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार सुनील शेळके, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत शहरातील विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या दौऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या भांगरवाडी ते नांगरगाव दरम्यानच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास सोमवारपासून...











