Home Breaking News पुणे पोलिसांची नवी पहल! पोलीस उप-आयुक्त स्वतः येणार ठाण्यांमध्ये – प्रलंबित तक्रारींवर...

पुणे पोलिसांची नवी पहल! पोलीस उप-आयुक्त स्वतः येणार ठाण्यांमध्ये – प्रलंबित तक्रारींवर थेट मार्गदर्शन | नागरीकांनी घ्यावी उपस्थिती

पुणे शहर पोलिसांकडून नागरिकांशी थेट संवाद वाढवण्यासाठी एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेने एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे, ज्यामध्ये पोलीस परिमंडळाचे उप-आयुक्त स्वतः पोलीस ठाण्यांमध्ये हजर राहून प्रलंबित गुन्हे व तक्रारी अर्जांच्या निपटाऱ्यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
पोलीस ठाण्यांना भेट देणार पोलीस उप-आयुक्त
हा उपक्रम मंगळवार, २९ जुलै ते गुरुवार, ३१ जुलै २०२५ दरम्यान राबवण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक परिमंडळाचे पोलीस उप-आयुक्त तीन दिवस आपापल्या अधिपत्याखालील पोलीस ठाण्यांना भेट देतील, आणि तिथे असलेल्या प्रलंबित गुन्हे व तक्रारी अर्जांची तपासणी व मार्गदर्शन करतील.
 यामध्ये सहभागी पोलीस स्टेशन खालील प्रमाणे:
परिमंडळ १: फरासखाना, खडक
परिमंडळ २: बंडगार्डन, स्वारगेट
परिमंडळ ३: शिवाजीनगर, कोरेगाव पार्क, पर्वती, कोथरुड, उत्तमनगर
परिमंडळ ४: खडकी, चतु:श्रृंगी, चंदननगर
परिमंडळ ५: हडपसर, काळेपडळ, फुरसुंगी
 नागरिकांना खुले आवाहन
पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे की ज्यांच्या तक्रारी किंवा गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये प्रलंबित आहेत, त्यांनी संबंधित दिवशी पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे. नागरिक आणि पोलिसांमधील सुसंवाद वाढवण्यासाठी आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद गतीने करण्यासाठी ही एक महत्वपूर्ण संधी आहे.
 नागरिकांसाठी महत्त्वाचे फायदे
तक्रारी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मांडण्याची संधी
गुन्ह्यांच्या तपास प्रक्रियेचा आढावा
स्थानिक पोलीस ठाण्याचे कार्यप्रणाली समजून घेण्याची संधी
पारदर्शकतेला चालना