पिंपरी-चिंचवडमधील हॉटेलमध्ये गोळीबार; एक जण अटकेत.
पिंपरी-चिंचवड: काल रात्री ८:४५ वाजता काळेवाडी येथील राहुल बार आणि खुशबू रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा गोळीबार माजी नगरसेवक विनोद नाधे यांच्या लायसन्स असलेल्या पिस्तुलातून करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासाअंती समजले की, गुरुवारी रात्री आरोपी सचिन दत्तू नाधे, सचिन नाधे, माजी नगरसेवक विनोद नाधे, तुकाराम नाधे आणि माऊली नाधे हे सर्व हॉटेलच्या पहिल्या...
दलितांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी महाराष्ट्र बीजेपीने काँग्रेसवर आरक्षणविरोधी असल्याचा आरोप केला.
महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी, भाजप पुन्हा दलित समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी काँग्रेसवर निशाणा साधत आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपवर ‘असंविधानिक’ असल्याचा आरोप करून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी दलित आणि मागासवर्गीयांच्या मतांमध्ये घसरण घडवली होती. राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील आरक्षणावरील वक्तव्यांमुळे भाजप आता काँग्रेसला ‘आरक्षणविरोधी’ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेत विद्यार्थ्यांशी बोलताना भारतातील आरक्षण व्यवस्था केवळ 'न्याय्य भारत'...
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांना सोईसुविधा उपलब्ध करुन द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणारा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सर्व संबंधित शासकीय यंत्रणानी विविध संघटनांना विश्वासात घेवून यशस्वी करावा, अनुयायांची कोणतीही गैरसोय होणार नाही यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. अनुयायांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी...
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत टाकला पहिला मत
नवी दिल्ली | देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठीची अत्यंत महत्त्वाची निवडणूक आज सकाळपासून संसदेच्या परिसरात सुरू झाली आहे. सकाळी अचूक १० वाजता मतदानाला प्रारंभ झाला आणि सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला मताधिकार बजावला. थेट लढत रंगलीया निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार जस्टिस (नि.) बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत रंगली आहे. त्यामुळे निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. मतदान व...
निवृत्त ACP रेहाना गफूर शेख यांचा मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश
मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्राच्या प्रशासकीय व कायदा-सुव्यवस्थेच्या क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेल्या निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) रेहाना गफूर शेख यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अधिकृत प्रवेश केला. मुंबईतील मातोश्री येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्यामुळे शिवसेनेच्या राजकीय व संघटनात्मक ताकदीत भर पडल्याचे मानले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी स्वतः रेहाना शेख यांचे पक्षात स्वागत करत, त्यांच्या...
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वात रंगला दिंडी, लोकनृत्य व मराठी गीतांचा ऐतिहासिक सोहळा.
पिंपरी- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात समाज परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या अण्णाभाऊंच्या कार्याचा गौरव करत पारंपरिक लोककलांचा अनोखा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक , साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब रसाळ,सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे, संदीपान झोंबाडे, नाना कसबे,संजय ससाणे,अरूण जोगदंड,सतिश भवाळ,नितीन...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: मुंबईत मतदार टक्केवारी वाढवण्यासाठी BMC ची मतदारमित्र पावले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने (BMC) मतदार सहभाग वाढवण्यासाठी आणि मतदान केंद्रांवर सोयी-सुविधा पुरवण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत. मागील लोकसभा निवडणुकीतील कमी मतदानाच्या पार्श्वभूमीवर यंदा या निवडणुकीत मतदारांचा अनुभव सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. मतदारांसाठी खास सोयी-सुविधा: बैठकीच्या सोयी: मतदान केंद्रांवर मतदारांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची सोय: शुद्ध आणि मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले...
“पिंपरी-चिंचवड: अपक्ष उमेदवारांच्या प्रभावी परंपरेत खंड; २०२४ विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मुख्य अपक्ष उमेदवारांची अनुपस्थिती”
पिंपरी-चिंचवड, दि. १३ नोव्हेंबर २०२४ - पिंपरी-चिंचवड शहरात अपक्ष उमेदवारांनी निर्माण केलेली १५ वर्षांची मजबूत परंपरा आणि स्थानिक पातळीवरील समाजकार्य व राजकीय कौशल्यांमुळे मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या अपक्ष उमेदवारांचे प्रभावी अस्तित्व यावेळी कमी होताना दिसत आहे. आगामी २०२४ विधानसभा निवडणुकीत भोसरी आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघांमध्ये पहिल्यांदाच प्रमुख अपक्ष उमेदवारांचा अभाव जाणवत आहे, ज्यामुळे स्थानिक राजकीय समीकरणे वेगळी होण्याची शक्यता...
धनश्री रुग्णालयात नव्या वैद्यकीय सोयीसुविधांचा समावेश, रुग्णांसाठी एक मोठे पाऊल!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यातील मोशी येथील ‘धनश्री रुग्णालया’चे डिजिटल उदघाटन संपन्न झाले. धनश्री रुग्णालयाला शुभेच्छा देताना ते म्हणाले, "इथे आलेला प्रत्येक रुग्ण पूर्णतः बरा व्हावा आणि त्याला पुन्हा रुग्णालयात येण्याची गरज पडू नये, असे यश धनश्री रुग्णालयाला लाभो." या रुग्णालयात विविध वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्या रुग्णांसाठी निश्चितच उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी...
पालखी सोहळा २० जून २०२५ – पुणे शहरात वाहतुकीत तात्पुरते बदल; नागरिकांसाठी पर्यायी मार्गांची घोषणा
पुणे (दि. १९ जून २०२५) – संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुणे शहरात २० जून रोजी आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूककोंडी टाळण्यासाठी तसेच पालखी मार्गावरील शिस्तबद्ध आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी वाहतूक विभागाने अनेक रस्त्यांवर तात्पुरते निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी माहिती दिली की,...
















