पुणेकरांसाठी दिलासादायक पाऊल? सुप्रिया सुळे यांची पुण्यात हायकोर्ट खंडपीठासाठी ठाम मागणी!
पुणे : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या घोषणेनंतर, पुण्यातही हायकोर्ट खंडपीठ स्थापन व्हावे, ही मागणी अधिक जोमाने पुढे आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजय देशमुख यांना पत्र लिहून ही मागणी लावून धरली आहे. खासदार सुळे यांच्या मते, पुणे हे केवळ एक सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र नाही, तर राज्यातील एक महत्त्वाचे औद्योगिक व...
पगाराच्या थकबाकीसाठी पुण्यात टीसीएस कर्मचाऱ्याचं धाडसी आंदोलन! फूटपाथवर झोपून मागितला न्याय
पुणे – देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या TCS (Tata Consultancy Services) च्या पुणे ऑफिसबाहेर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंपनीकडून थकवलेल्या पगाराच्या मागणीसाठी सौरभ मोरे या तरुणाने थेट ऑफिसबाहेरील फूटपाथवर झोपून आंदोलन केलं. सौरभ मोरे याने आपल्या शारीरिक आणि मानसिक कष्टांचे मोबदले मिळावे यासाठी रात्रीच्या अंधारातही न डगमगता लढा दिला. त्याचा फूटपाथवर झोपलेला फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला...
पर्यटनासाठी नवा प्रवास सुरू! पीएमपीएमएलची बससेवा क्र. १२ ठरणार पर्यटकांसाठी पर्वणी
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) पर्यावरणपूरक व वातानुकूलित पर्यटन बससेवा उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नव्या क्र. १२ मार्गाची सुरुवात करण्यात आली आहे. ही सेवा पुणे आणि परिसरातील पर्यटकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, या उपक्रमामुळे पुण्यातील पर्यटनाला नवसंजीवनी मिळणार आहे. पर्यावरणस्नेही आणि आरामदायक सेवा: या बससेवेच्या माध्यमातून प्रवाशांना केवळ पर्यटनस्थळांची सफर नव्हे, तर पर्यावरणपूरक प्रवासाचाही अनुभव मिळणार आहे. वातानुकूलित, आरामदायक आणि सुरक्षित...
कायद्याचा अपमान की VIP संस्कृतीचा कहर? शिरूरमध्ये फॉर्च्युनरवर ‘लोकसभा सदस्य’ स्टिकर; कार्यकर्त्यास दंड नको, फोनवरच माफ!
शिरूर (पुणे): शिरूर शहरात नुकताच घडलेला एक प्रकार सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. सामान्य नागरिकांना नियम मोडल्यास तात्काळ दंड आणि एफआयआरचा सामना करावा लागतो, पण ‘विशेष व्यक्तींच्या’ कार्यकर्त्यांना मात्र केवळ एका फोन कॉलवर माफ केले जाते, ही बाब खरोखरच धक्कादायक आहे. गाडी क्रमांक MH43-BN-4545 ही एक आलिशान फॉर्च्युनर शिरूर परिसरात मिरवत होती. विशेष म्हणजे या गाडीवर 'भारतीय राजमुद्रा', 'सत्यमेव...
निगडीत रिक्षा पलटीचा अपघात : मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले मदतीला धावले; माणुसकीचा मोठा संदेश
निगडी परिसरातील पुणे गेट हॉटेल समोर घडलेल्या अपघातात एका रिक्षाचा अचानक पलटी होऊन मोठी दुर्घटना टळली. या अपघातात एक महिला आणि रिक्षाचालक अडकले असताना, नशिबाने त्या मार्गावरून जात असलेले मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ मदतीचा हात दिला. सचिन चिखले हे कामानिमित्त देहूकडे जात होते. त्यावेळी रस्त्यावर एक रिक्षा (MH-14 KU-7411) उलटलेली दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता...
पुणे पोलिसांची तिहेरी यशस्वी कारवाई : चेन स्नॅचिंग, मोबाईल चोरी व वाद्यपथकातील साहित्य चोरणारे आरोपी गजाआड!
पुणे – बाणेर परिसरात विविध स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांचा तपास अत्यंत कौशल्याने सोडवला आहे. चेन स्नॅचिंग, मोबाईल हिसकावणे आणि सांस्कृतिक साहित्य चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या तिघांना अटक करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटना १ : बालेवाडीतील चेन स्नॅचिंग प्रकरण दि. ११ जुलै २०२५ रोजी पर्ल सोसायटी, बालेवाडी येथे एका महिलेला...
पुणे पोलिसांची यशस्वी कारवाई : बाणेरमध्ये अवैध पिस्तूलसह संशयित जेरबंद!
पुणे शहराच्या बाणेर परिसरात एका युवकाकडून बेकायदेशीर देशी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि कारसह एकूण ६ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करत पुणे पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. बाणेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डाबेराव आणि त्यांच्या तपास पथकाने ही कारवाई केली. दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी, पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की रविराज...
दोन तासात खून उलगडला! काळेपडळ पोलिसांची झपाटलेली कारवाई – खोटा कॉल करून फसवणूक करणारा मित्रच निघाला खून करणारा!
पुणे शहरातील काळेपडळ पोलिसांनी अवघ्या दोन तासांत खून उघडकीस आणत एक धक्कादायक गुन्हा उघडकीस आणला आहे. पहाटेच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या कॉलनुसार, चार अनोळखी इसमांनी एका तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला करून त्याचा खून केला, असा बनाव करण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या कसोशीनंतर आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने केलेल्या तपासामुळे एक धक्कादायक सत्य समोर आले – खून करणारा दुसरा-तिसरा कोणी नसून, खुद्द...
पुणे वाघोलीत भांड्याच्या दुकानात चोरी करणारे तिघे आरोपी जेरबंद; पोलिसांची शानदार कामगिरी!
पुणे शहराच्या वाघोली भागात "श्री कृष्णा मेटल्स" नावाच्या भांड्याच्या दुकानात दिनांक ३१ जुलै रोजी रात्री चोरी करणाऱ्या चोरट्यांना वाघोली पोलिसांनी केवळ काही तासांत अटक करत गुन्हा उघडकीस आणला आहे. चोरी झालेल्या रिक्षासह एकूण ५९,०१० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, या प्रकरणी दोन आरोपी व एक विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या चोरीची तक्रार दुकानाचे मालक प्रियंकानगरी, वाघोली...
माधुरीला परत आणा! कोल्हापुरात जनतेचा अभूतपूर्व उद्रेक; ३० हजार लोकांचे पायी आंदोलन, न्यायालयीन निर्णयावर संताप
"ही कोल्हापूरची माती आहे, इथे माणुसकी अजूनही जिवंत आहे" – असा भावनिक नारा देत कोल्हापुरातील हजारो नागरिकांनी हत्तीण माधुरी उर्फ महादेवी हिच्या परतीसाठी रविवारी (३ ऑगस्ट २०२५) ऐतिहासिक मौनमोर्चा काढला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ३० हजारांहून अधिक नागरिकांनी ४५ किमीचा पायी प्रवास करत जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी निवेदन दिले. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील...




