बाणेरमध्ये मोठी कारवाई! पावणेसहा लाख रुपयांचा ‘हायड्रोफोनीक गांजा’ जप्त; शिक्षित तरुण अटकेत
पुणे शहराच्या बाणेर भागात एक धक्कादायक आणि गंभीर अंमली पदार्थ प्रकरण उघडकीस आले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केलेल्या कारवाईमध्ये तब्बल ५,५६,४००/- रुपयांचा ‘हायड्रोफोनीक गांजा’ (Ozokush Ganja) जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दि. १० एप्रिल २०२५ रोजी करण्यात आली असून, यामध्ये अर्जुन लिंगराज टोटिगर (वय २६, रा. सुखवानी पॅनरोमा, सुसगाव, बाणेर) या तरुणाला...
पुण्यात बनावट सोने दाखवून सराफ दुकानदारांची फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात – ८ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : युनिट ६, गुन्हे शाखा, पुणे शहराने बनावट सोन्याचे दागिने दाखवून सराफ दुकानदारांची फसवणूक करणाऱ्या सराईत टोळीला जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत तब्बल ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रकरणाची सविस्तर माहिती :दि. १८ ऑगस्ट रोजी सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे आणि पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना गोपनीय...
चिंतामणी ते निलगिरी रस्ता दत्तक घेण्याचा ऐतिहासिक निर्णय: अजित पवारांच्या आवाहनाला चिंतामणी ज्ञानपीठाचा सकारात्मक प्रतिसाद, दक्षिण पुण्यात विकासाची नवीन दिशा
पुणे (प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जनसहभागातून विकास करण्याच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत, चिंतामणी ज्ञानपीठ आणि ऐश्वर्या कट्टा यांनी महानगरपालिकेच्या सहकार्याने आंबेगाव परिसरातील चिंतामणी चौक ते निलगिरी चौक हा महत्त्वाचा रस्ता दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय दक्षिण पुण्यातील विकासाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या ऐतिहासिक उपक्रमाचे उद्घाटन महापालिकेच्या उपायुक्त माधव जगताप, डॉ. विजय थोरात...
मुंबईत ‘आयडिया एक्स्पो २०२६’चे उद्घाटन; पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्रातील नवकल्पनांना मिळणार नवे व्यासपीठ
मुंबईत पायाभूत सुविधा, बांधकाम आणि शाश्वत शहरी विकासाला चालना देणाऱ्या ‘आयडिया एक्स्पो २०२६’ या महत्त्वपूर्ण प्रदर्शनाचे आज उत्साहात उद्घाटन करण्यात आले. Jio World Centre येथे आयोजित या भव्य प्रदर्शनाचे आयोजन गृहनिर्माण विभाग आणि Indian Institute of Architects – IDAC, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. मुंबईतील Bandra Kurla Complex या व्यावसायिक केंद्रात तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात देशभरातील...
पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षेखाली समिती नेमणार – मंत्री डॉ.उदय सामंत
नागपूर : पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षेखाली समिती आहे. मात्र लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार विभागीय आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात येईल, असे मंत्री डॉ.उदय सामंत यांनी सांगितले. पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडीबाबत सदस्य भीमराव तापकीर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर मंत्री डॉ. सामंत बोलत होते. मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, पुणे महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियोजन...
वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना – पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
मुंबई, दि. 20 : महाराष्ट्रात उत्पादित डाळिंबाचा हंगामातील पहिला कंटेनर मुंबईतील जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना करण्यात आला आहे. कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरून हा कंटेनर रवाना करण्यात आला असून राज्यातील फळनिर्यातीच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, अशी माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. अमेरिका - भारत कृषी-निर्यातविषयक घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर...
टी.सी.एस. ते आकुर्डी घाट-वळण रस्त्यावर नागरिकांची दुतर्फा गर्दी – उद्घाटनाला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची उपस्थिती
पुणे : ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याला प्रचंड उत्साहात सुरुवात झाली. टी.सी.एस. सर्कल, हिंजवडी येथून सुरू झालेल्या या टप्प्याची विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून औपचारिक सुरूवात झाली. या वेळी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली. पहिल्या टप्प्यातील एकूण अंतर...
धक्कादायक! महिला डॉक्टरची गाडीत आत्महत्या; सांगली जिल्हा हादरला, निलम गोऱ्हेंची पारदर्शक चौकशीची मागणी
सांगली | सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील विठ्ठलवाडी परिसरात एका महिला डॉक्टरने आपल्या चारचाकी गाडीतच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डॉ. शुंभागी समीर वानखडे (मु.रा. मुंबई) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, त्या मूळच्या मुंबईतील रहिवासी होत्या. गाडीतच सापडल्या रक्ताच्या थारोळ्यात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डॉ. शुंभागी वानखडे यांनी ब्लेडच्या सहाय्याने हाताच्या आणि गळ्याच्या नसा कापून आत्महत्या केली. त्या घरातून "दवाखान्यात...
अंमली पदार्थविरोधी पथकाची मेगा कारवाई! ₹20.70 लाखांचा मोठा ड्रग्स साठा जप्त — एमडी, ब्राउन शुगर, कोकेनसह आरोपीला अटक
पुणे शहरातील वाढत्या अमली पदार्थांच्या व्यवहारांना मोठा धक्का देत Anti Narcotic Cell – 2 ने एक महत्त्वपूर्ण आणि धडाकेबाज कारवाई करत तब्बल ₹20,70,500 किमतीचे विविध ड्रग्स जप्त केले आहेत. या कारवाईत एक आरोपी ताब्यात घेण्यात आला असून, शहरात ड्रग्सचे जाळे मजबूत करणाऱ्या मोठ्या टोळीपर्यंत पोहोचण्याचा मार्गही खुले झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. गोपनीय माहितीवरून कारवाई — पथकाचा जलद सापळा अंमली पदार्थविरोधी...
दक्षता अन् सुदैवाने मोठा अनर्थ टळला! साउथ मुंबईत BEST ची डबल डेकर इलेक्ट्रिक बस पेटली, प्रवासी सुखरूप; तपास सुरू
मुंबई | मुंबईतील नेहमी गजबजलेल्या सिद्धार्थ कॉलेज सिग्नल, फोर्ट परिसरात मंगळवारी सकाळी सुमारे ९.१५ वाजता, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अॅण्ड ट्रान्सपोर्ट (BEST) यांची एक इलेक्ट्रिक डबल डेकर बस अचानक आगीच्या भक्षस्थानी पडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब मानली जात आहे. नेमकी घटना कशी घडली? सदर बस भाटिया बाग येथून बॅकबे डेपोकडे जात असताना अचानक बसच्या समोरील डाव्या...











