Home Breaking News पुण्यात बनावट सोने दाखवून सराफ दुकानदारांची फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात –...

पुण्यात बनावट सोने दाखवून सराफ दुकानदारांची फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात – ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

62
0
पुणे : युनिट ६, गुन्हे शाखा, पुणे शहराने बनावट सोन्याचे दागिने दाखवून सराफ दुकानदारांची फसवणूक करणाऱ्या सराईत टोळीला जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत तब्बल ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्रकरणाची सविस्तर माहिती :

दि. १८ ऑगस्ट रोजी सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे आणि पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना गोपनीय माहिती मिळाली की, वाघोली परिसरात काही इसम सराफ दुकानदारांची फसवणूक करण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी खांदवेनगर भागात सापळा रचून कारवाई केली.
तपासादरम्यान पोलिसांच्या हाती तीन संशयित लागले. त्यांची चौकशी केली असता त्यांची नावे –
१) रोहित संजय गोरे (वय ३०, रा. मोहन नगर, धनकवडी)
२) अजय दत्तात्रय पवार (वय २८, रा. वडगाव बुद्रुक)
३) ओम सुंदर खरात (वय २३, रा. वडगाव बुद्रुक)
अशी समोर आली.
 गुन्ह्यांचा इतिहास उघडकीस :
या आरोपींनी यापूर्वीही विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत फसवणुकीचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याविरुद्ध चंदननगर, कळेपडळ, पर्वती आणि आंबेगाव पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ४ गुन्हे दाखल आहेत.
 जप्त केलेला मुद्देमाल :
🔹 ३ लाख रुपये रोख रक्कम
🔹 १ लाख रुपये किमतीचे मोबाईल फोन
🔹 ४ लाख रुपये किमतीचे बनावट हॉलमार्क सोन्याचे दागिने
— असा एकूण ८ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
 प्रशासनाचे मार्गदर्शन :
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा) श्री. निखिल पिंगळे आणि मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा-२) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यामध्ये सपोनि राकेश कदम, सपोनि मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, नेहा तापकीर, प्रतिक्षा पानसरे यांच्यासह युनिट ६ च्या पथकाने ही धाडसी कामगिरी केली.
 पुढील कारवाई :
सदर आरोपींना चंदननगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.