महाराष्ट्र
पुणे मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; पीसीएमसी स्थानकाचे प्रवेशद्वार क्र. ३ आणि पादचारी पूल उद्यापासून सुरू
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे पुणे मेट्रो अंतर्गत पीसीएमसी मेट्रो स्थानक येथील प्रवेशद्वार क्रमांक ३ हे १४ फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत खुले होणार आहे. यासोबतच रस्ता सुरक्षितपणे ओलांडण्यासाठी उभारण्यात आलेला पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रिज) देखील नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ प्रवेशद्वार क्र. ३ सुरू झाल्यामुळे स्थानकाच्या आजूबाजूच्या रहिवाशांना आणि कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी एका बाजूनेच...
जुहूमध्ये रंगला पहिला पुष्पोत्सव; पद्मश्री अक्षय कुमार यांच्या हस्ते भव्य उद्घाटन
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने जुहू परिसरातील पुष्पा नरसी उद्यान येथे आयोजित भव्य पुष्पोत्सवाचे आज उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेते आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अक्षय कुमार यांनी उपस्थित राहून पुष्पोत्सवाचे उद्घाटन केले. या प्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, आमदार अमित साटम, आमदार हारुन खान तसेच अनेक नगरसेवक, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला...
पुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत विकासकामांना गती; गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेवर पूर्णतेवर भर
पुणे : पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास आणि शहरी सुविधा यांसारख्या क्षेत्रांतील प्रकल्पांवर विशेष चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान जिल्ह्याचा विकास हा केवळ वेगवान नव्हे, तर गुणवत्तापूर्ण आणि नियोजित पद्धतीने झाला...
जालना जिल्हा वार्षिक योजनेसाठी वाढीव निधीची मागणी; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आढावा बैठक
जालना : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी जालना जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२६–२७ या वर्षाचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याच्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून जालना जिल्ह्यासाठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. बैठकीदरम्यान पायाभूत सुविधा,...
पुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत विकासकामांना वेग; ५४ किमी भुयारी मार्ग, अतिक्रमण निर्मूलन आणि वाहतूक सुधारणा यावर भर
पुणे : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची मानली जाणारी जिल्हा नियोजन समिती (DPC) बैठक आज उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रावहिनी पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील विविध पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, शासकीय योजना आणि प्रलंबित विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून विकासकामांना अधिक गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन…
पिंपरी, १२ फेब्रुवारी २०२६ :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा व व्यापक विचारांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १५ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शहरात विविध ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली आहे. या प्रबोधन पर्वात ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्यासह ‘शिवशंभो गर्जना’, ‘शाहीरी कार्यक्रम’,...
रामटेक येथे पंकजाताई मुंडे यांची सदिच्छा भेट; महिला सक्षमीकरण, स्वावलंबन व POSH कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर सखोल चर्चा
मुंबई (रामटेक) : राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा. ना. पंकजाताई मुंडे यांची आज ‘रामटेक’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या विविध योजना, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाचे धोरणात्मक निर्णय आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी यावर सविस्तर संवाद झाला. बैठकीत ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वयंरोजगार, बचत गट, कौशल्य विकास प्रशिक्षण, लघुउद्योगांना प्रोत्साहन, महिला उद्योजकता...
मुंबईत देशातील पहिला ‘संगीत रस्ता’ लोकार्पित; किनारी मार्गावरून वाहनचालकांना ‘जय हो’ची सुरेल अनुभूती
मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावर उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्यावहिल्या ‘संगीत रस्त्या’चे आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या अभिनव उपक्रमामुळे मुंबईकरांसह पर्यटकांना आता प्रवास करताना एक अनोखा आणि सुरेल अनुभव मिळणार आहे. या कार्यक्रमाला हंगेरीचे वाणिज्य दूत श्री. फॅरेन जारी, माजी खासदार राहुल शेवाळे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व...
‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन’ला देशभक्तीचा उत्स्फूर्त प्रतिसाद; गेटवे ऑफ इंडियावर हजारो सायकलपटूंची राष्ट्रभक्तीपूर्ण धाव
मुंबई : देशभक्ती, तंदुरुस्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या CISF मुख्यालयाच्या वतीने आयोजित ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन’ला आज गेटवे ऑफ इंडिया येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अरबी समुद्राच्या साक्षीने आणि ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडियाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या उपक्रमात शेकडो सायकलपटूंनी सहभाग घेत राष्ट्रप्रेमाचा अनोखा संदेश दिला. या सायक्लोथॉनमध्ये CISF चे जवान, अधिकारी, युवा सायकलपटू, फिटनेसप्रेमी नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी...
आधुनिक पिंपरी-चिंचवडसाठी भाजपचे नवे सारथी सज्ज”:- शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे
पिंपरी (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर, शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी आणि विकासाची गंगा घराघरांत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज झाली आहे. नवनिर्वाचित महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर आणि सभागृह नेते प्रशांत शितोळे यांचा आज मोरवाडी येथील भाजपा शहर मध्यवर्ती कार्यालयात जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला. हा सोहळा केवळ सत्काराचा नसून, आगामी पाच वर्षांच्या 'विकास...




