महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 200

“न्यायप्रणालीत ऐतिहासिक सुधार — नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रदर्शनाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भव्य उद्घाटन”

0

आझाद मैदान, मुंबई :- मुंबईच्या आझाद मैदानात आज न्यायव्यवस्थेतील सर्वात मोठ्या सुधारणांपैकी एक ठरणाऱ्या नवीन फौजदारी कायद्यांवरील व्यापक जनजागृती प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. न्यायप्रक्रियेतील गती, पारदर्शकता आणि नागरिककेंद्रित बदलांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी उभारण्यात आलेले हे प्रदर्शन अत्यंत प्रभावी ठरले. कार्यक्रमासाठी राज्यातील अनेक मान्यवर विशेषतः उपस्थित होते. यात 🔸 विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर🔸 उपमुख्यमंत्री अजित पवार🔸...

युवा महोत्सव युवक-युवतींच्या नेतृत्वगुणांना वाव देणारे प्रभावी व्यासपीठ -क्रीडा व युवक कल्याण आयुक्त शितल तेली उगले

0

पुणे : युवा महोत्सव म्हणजे केवळ स्पर्धांचे आयोजन नव्हे, तर युवक-युवतींना विविध क्षेत्रांत आपले नेतृत्वगुण सिद्ध करण्याचे सशक्त व्यासपीठ आहे. युवकांचा सर्वांगिण विकास साधणे, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करणे, युवकांमधील सुप्त गुणांना वाव देणे तसेच राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या आयुक्त...

बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराबाहेर गोळीबार; पुण्यातून चार आरोपी अटकेत

0

मुंबई | प्रतिनिधी बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली आहे. रविवारी मध्यरात्री सुमारे १२.४० वाजता अज्ञात व्यक्तीने जुहू येथील ‘शेट्टी टॉवर’ या १० मजली इमारतीबाहेर तब्बल पाच गोळ्या झाडल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर अवघ्या काही तासांतच पुणे पोलिसांनी मोठी कारवाई...

इलेक्ट्रीक ट्रक निर्मितीसाठी राज्य शासन सर्व सहकार्य करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

पुणे : ब्ल्यू एनर्जी मोटर्स निर्मित स्वॅपेबल बॅटरी असलेला इलेक्ट्रिक ट्रक म्हणजे 'रिव्होल्यूशन ऑन व्हील' असून त्यातील तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता लक्षात घेता येत्या काळात या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार होईल. राज्य शासन मुंबई- पुणे इलेक्ट्रीक कॉरिडोअरसारखे अन्य कॉरिडोर करण्यासाठी सर्व सहकार्य करेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केले.   निघोजे येथील ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकच्या शुभारंभ प्रसंगी ते...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशी मुंबईत भेट; गुंतवणूक, उद्योग व कौशल्य विकासावर सविस्तर चर्चा

0

मुंबई : महाराष्ट्र आणि फिनलंड यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष Alexander Stubb यांची मुंबईतील The Taj Mahal Palace, Mumbai येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्र आणि फिनलंड यांच्यातील आर्थिक, औद्योगिक व शैक्षणिक सहकार्याच्या विविध संधींवर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीत दोन्ही बाजूंनी उद्योग, व्यापार, हरित तंत्रज्ञान,...

वाघोलीत वाहनचोरांवर पोलिसांची मोठी कारवाई; बाहेर जिल्ह्यातून येऊन चोरी करणारे दोन सराईत आरोपी जेरबंद, तीन गुन्हे उघड

0

पुणे शहर व परिसरात वाढत चाललेल्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी उत्कृष्ट तपास करत दोन सराईत वाहनचोर आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तीन वेगवेगळे वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. दिनांक ०५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १ वाजण्याच्या...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महापालिकेच्या वतीने वाहण्यात आली आदरांजली

0

पिंपरी, दि. २८ जानेवारी २०२६ - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, शहर अभियंता मकरंद निकम,नगररचना उपसंचालक किशोर गोखले,मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण...

आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या आयोजनाने पुण्याचे नाव जगभरात पोहोचले- मंत्री चंद्रकांतदादा पाटील

0

पुणे : ‘बजाज पुणे ग्रँड टूर- २०२६’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाने पुण्याचे नाव जगात पोहोचले. प्रशासनाने गेले सहा महिने या स्पर्धेसाठी खूप मेहनत व तयारी केली, अशा शब्दात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पर्धेच्या समारोपप्रसंगी प्रशासनाचे कौतुक केले. ‘बजाज पुणे ग्रँड टूर- २०२६’ च्या अंतिम टप्प्यासह स्पर्धेच्या यशस्वी समारोप आज बालगंधर्व रंगमंदीर समोर झाला....

मांजरीत चैन स्नॅचिंगचा पर्दाफाश; ७० सीसीटीव्हींच्या आधारे आरोपी जेरबंद, सोन्याची चैन जप्त

0

पुणे : मांजरी परिसरातील शेवाळवाडी भाजी मंडई भागात घडलेल्या चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा पुणे शहर पोलीसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपासातून पर्दाफाश केला आहे. अवघ्या काही दिवसांत आरोपीला अटक करत त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हस्तगत करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी शुभकल्प सोसायटीजवळ, शेवाळवाडी भाजी मंडईसमोर, सोलापूर रोड, मांजरी येथे...

Copyright ©