मुंबई | प्रतिनिधी
बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली आहे. रविवारी मध्यरात्री सुमारे १२.४० वाजता अज्ञात व्यक्तीने जुहू येथील ‘शेट्टी टॉवर’ या १० मजली इमारतीबाहेर तब्बल पाच गोळ्या झाडल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेनंतर अवघ्या काही तासांतच पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत चार तरुणांना अटक केली, तर एका संशयिताला नोटीस बजावण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पुण्यातील धायरी आणि वारजे-माळवाडी परिसरातून पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते.
आरोपी कोण?
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
-
सिद्धार्थ दीपक येनपुरे (२०)
-
समर्थ शिवशंकर पोमाजी (१८)
-
स्वप्निल बंडू सकट (२३)
-
आदित्य ज्ञानेश्वर गायकवाड (१९)











