महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 18

अण्णा बनसोडे, उपाध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा यांची पावसाळा पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक व पहाणी दौरा

0

पिंपरी, २३ मे २०२५ : पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाळ्यात घडणाऱ्या घटनांसह कोणत्याही आपत्तीला सक्षमपणे हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. पावसामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी शासनाने पूरग्रस्तांना दिलेली मदत वेळेत पोहोचवण्यासाठी त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याची खबरदारी संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देशही...

समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे भव्य उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते! महाराष्ट्राच्या विकासात ऐतिहासिक पाऊल

0

महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा क्षण आज घडला! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे मुंबईपासून नागपूरपर्यंतचा प्रवास आता पूर्णपणे अखंड आणि सुसज्ज महामार्गावरून होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या उर्वरित टप्प्याचे उद्घाटन झाल्याने ७०१ किलोमीटर लांब महामार्ग आता सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. या महामार्गामुळे समृद्ध महाराष्ट्राची संकल्पना आता प्रत्यक्षात उतरली आहे,...

काळेपडळ पोलिसांची अवैध दारु अड्ड्यावर मोठी कारवाई; २०६५ लिटर हातभट्टी दारू जप्त, एक आरोपी अटकेत!

0

पुणे | प्रतिनिधी :- पुणे शहरातील अवैध दारू विक्रीविरोधात मोठी मोहीम राबवित काळेपडळ पोलीस ठाण्याच्या पथकाने एका अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा मारून तब्बल २०६५ लिटर दारूसाठा जप्त केला आहे. सदर कारवाईत एक आरोपीस अटक करण्यात आली असून पोलिसांनी ही धाडसत्र प्रभावीपणे पार पाडले. दि. ११ जून २०२५ रोजी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस तपास पथकाने...

वैष्णवी आत्महत्या प्रकरणात खळबळजनक वकिलांचा युक्तिवाद; रोहिणी खडसे यांची संतप्त प्रतिक्रिया – “त्या वकिलाला कानाखाली मारणाऱ्याचा मी सत्कार करीन!”

0

प्रतिनिधी | मुंबई | हगवणे प्रकरणात मृत वैष्णवी हिच्या चारित्र्यावरच संशय घेणारा आणि आरोपीची बाजू सावरणारा युक्तिवाद काल न्यायालयात करण्यात आला. या युक्तिवादामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून, महिला नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोर्टात आरोपी पक्षाच्या वकिलांकडून अजब तर्क वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येप्रकरणात आरोपी असलेल्या तिच्या पतीसह कुटुंबियांच्या बाजूने बोलताना वकिलांनी चक्क मृत वैष्णवीच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत "नवऱ्याने...

मुंबई-नागपूर हायवेवर भीषण अपघात – कबीर मठाचे महंत प्रियरंजन दास यांचा जागीच मृत्यू

0

मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण कबीरपंथीय समाजाला हादरवून सोडले आहे. एरंडोल तालुक्यातील पिंपरी बुद्रुक फाट्याजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पिंपरी बुद्रुक कबीर मठाचे आदरणीय महंत प्रियरंजन दास (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. महंत प्रियरंजन दास बंगळुरू येथून १५ दिवसांचा धार्मिक कार्यक्रम संपवून आपल्या मठात...

नागपूरमधील लीज प्रॉपर्टीज फ्री-होल्ड करण्याबाबत विचार करणार – मंत्री शंभूराज देसाई

0

नागपूर, दि. 15 :  नागपूर महानगरपालिका व सुधार प्राधिकरणाच्या भाडेपट्ट्याने दिलेल्या मालमत्तांबाबतचे करार संबंधित अटी-शर्तींनुसार सुरू आहेत. मात्र या मालमत्ता फ्री-होल्ड करून भूखंडधारक किंवा मालमत्ताधारकांना देण्याबाबतचा प्रस्ताव नुकताच  प्राप्त झाला असल्याने तो तातडीने तपासण्यात येईल, अशी माहिती  मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्राधिकरणामार्फत भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंड व मालमत्तांबाबत विधानसभा सदस्य प्रवीण दटके यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे मुद्दा उपस्थित...

हडपसर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षमतेने हुंडाबळी प्रकरणातील आरोपीस सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

0

पुणे – हडपसर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षम तपासानंतर आणि सरकारी पक्षाच्या प्रभावी युक्तिवादानंतर हुंडाबळी प्रकरणातील आरोपीस न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली. या घटनेमुळे समाजात महिलांवरील अत्याचार आणि हुंडा प्रथेचा गंभीर विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. हुंड्यासाठी छळ, पत्नीचा मृत्यू अन् न्यायाचा विजय! ही घटना १५ नंबर, मनीष सुपर मार्केट मागे, लक्ष्मी कॉलनी, हडपसर, पुणे येथे घडली. दिनांक ३०/११/२०२१...

लोणावळ्यात अवकाळी पावसाचा कहर! अवघ्या २४ तासांत २३३ मि.मी. पावसाची नोंद; पर्यटकांची व स्थानिकांची मोठी तारांबळ

0

मावळ तालुक्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळ लोणावळा शहरावर सोमवारी अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मात्र, यंदा मान्सूनपूर्व पावसानेच वातावरणात गोंधळ उडवला असून २४ तासांत तब्बल २३३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले, काही घरांत पाणी शिरले आणि वाहतूक ठप्प झाली. शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे मुंबई, पुणे आणि ठाणे भागातून हजारो पर्यटक पहिल्या पावसाचा आनंद...

पुणे मनपा हद्दीतील २३ गावांसाठी मुंबईत विशेष बैठक; विकास निधी, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वसुली व कर्मचारी पुर्नसेवेवर महत्त्वाचे निर्णय

0

 पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या प्रलंबित प्रश्नांवर आज सह्याद्री अतिथीगृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक नागरी सुविधा, विकासकामे, कर्मचारी समस्या आणि आर्थिक नियोजनासंबंधी अनेक ठोस निर्णय घेण्यात आले. राज्य सरकारने पुणेकर नागरिकांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत, एकूण १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची घोषणा केली. विकासासाठी आर्थिक पाठबळ – फुरसुंगी आणि उरुळी देवाची या नवीन नगर परिषदेच्या...

पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई! अपहरणाचा कट उधळला, मुख्य आरोपीसह तीन जणांना अटक

0

पुणे, ३ एप्रिल २०२५:पुणे शहरातील कोंढवा भागात एका व्यक्तीच्या अपहरणाचा कट गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने उधळून लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी अपहरण झालेल्या व्यक्तीला सुखरूप सोडवून मुख्य आरोपीसह तीन जणांना ताब्यात घेतले आहे.  अपहरणाचा थरार: 📌 १ एप्रिल २०२५ रोजी कॉलर नामे फिर्यादी (रा. कोंढवा, पुणे) याने पोलिसांना कळवले की, त्यांचे वडील (वय ४३) यांना दोन इसमांनी जबरदस्तीने गाडीत...

Copyright ©