Breaking News
‘संगीत मानापमान’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच; रसिकांसाठी संगीत-नाट्याचा सोहळा सुरू
मराठी रंगभूमीवरील अजरामर संगीत नाटक ‘मानापमान’ या कलाकृतीवर आधारित ‘संगीत मानापमान’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. या कार्यक्रमाला सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार, तंत्रज्ञ, तसेच रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. चित्रपटाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, नाट्य, संगीत, आणि मराठी संस्कृतीचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळणार असल्याची खात्री रसिकांनी व्यक्त केली आहे. चित्रपटाचे वैशिष्ट्य: संगीताचा भरगोस अनुभव: चित्रपटात मराठी...
“शरद पवार साहेब दीर्घायुषी राहावेत; आपले मार्गदर्शन असेच लाभत राहो” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुभेच्छा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. शिंदे यांनी केलेले हे मनापासूनचे अभिनंदन राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे. शिंदे म्हणाले की, “शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय, कृषी, सहकार, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात जे योगदान दिले आहे, ते अद्वितीय आहे. त्यांच्या विशाल अनुभवातून पुढील अनेक पिढ्या...
राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जम्मू कश्मीरकडे रवाना
जम्मू येथील वैष्णो धाम, कालिका धाम येथे होणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा १९ वर्षाखालील मुला-मुलींचा संघ रवाना झाला. या संघाला क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले, क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यापूर्वी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने श्री विठ्ठलराय जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे क्रीडा संकुल, डेरवण (ता....
पुणे गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; आठ महिन्यांपासून फरार ‘मोक्का’तील पाहिजे आरोपी युनिट-४ कडून जेरबंद
पुणे : Pune Police यांच्या गुन्हे शाखेतील युनिट–४ ने धडाकेबाज कारवाई करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत पाहिजे असलेला आरोपी आठ महिन्यांनंतर अटक करण्यात यश मिळवले आहे. शहरातील गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला हा आरोपी दीर्घकाळ फरार होता. गुप्त माहितीवरून सापळा वरिष्ठांच्या आदेशानुसार युनिट–४ चे अधिकारी आणि कर्मचारी गंभीर गुन्हे व मोक्का प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेत पेट्रोलिंग करत होते....
उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदनासाठी २ एकर भूखंड मंजूर केला: भाजप नेते
Mumbai: "महाराष्ट्र सरकारने अशी मागणी केली होती जेणेकरून राम मंदिराला जाणाऱ्या भाविकांना राज्य सरकारच्या वतीने निवासाची सोय उपलब्ध होऊ शकेल," असे श्री. चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी २ एकर भूखंड मंजूर केला आहे, असे राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी सांगितले. महाराष्ट्र सरकारने अशी मागणी केली होती, जेणेकरून राम मंदिराला जाणाऱ्या भाविकांना...
लालपरीला लागली भीषण धडक! महाड-दापोली राज्य मार्गावर एसटी बस रस्त्याच्या कडेला घसरली; १० प्रवासी जखमी, गंभीर अपघाताने खळबळ
रायगड / महाड : रायगड जिल्ह्यातील महाड-दापोली राज्य मार्गावर एका एसटी बसला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही पुणे फौजी आंबवडे मार्गावरील एसटी बस आंबवडे दिशेने जात असताना, रस्त्यावरील नियंत्रण सुटून बस थेट रस्त्याच्या कडेला घसरून खाली दरीत आदळली. या अपघातामध्ये एकूण १० प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ८ प्रवासी गंभीर जखमी, तर २ किरकोळ जखमी असल्याची...
मानवतेचा आदर्श ठरलेली जान्हवी! मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹2.50 लाखांची देणगी
मुंबई : सामाजिक भान आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी याचे उत्तम उदाहरण ठरवत जान्हवी सुधाकर यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी ₹2.50 लाखांचा धनादेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. मुंबईत आयोजित छोटेखानी समारंभात ही देणगी प्रदान करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जान्हवी यांचे मन:पूर्वक आभार मानत त्यांच्या या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. "संकटकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधी गरजूंना दिलासा देतो. अशा...
पुणे “सराईत वाहन चोराला खडक पोलिसांकडून अटक, 7 दुचाकी जप्त”
पुणे () : पुणे शहरात महागड्या दुचाकी चोरणाऱ्या परराज्यातील सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 2 लाख 35 हजार रुपये किमतीच्या यामाहा एफझेड, होंडा स्प्लेंडर, पॅशन अशा महागड्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई भांडे आळी, रविवार पेठ येथे करण्यात आली. गोवर्धनप्रसाद ललवा साहु (वय 35, राहणार किष्कींदानगर, पौड रोड, कोथरुड, मूळ रा. भोडसा, पोस्ट कौडीया,...
‘ऊर्जासंपन्न महाराष्ट्र’चा आणखी एक टप्पा पूर्ण! तिल्लारी जलविद्युत प्रकल्पासाठी 1008 कोटींचा सामंजस्य करार – 240 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारणार
मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि हरित भविष्यासाठी घेतल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण पावलांपैकी एक म्हणजे तिल्लारी उदंचन जलविद्युत प्रकल्प. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभाग आणि श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था, वारणानगर यांच्यात आज 240 मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या सामंजस्य करारामुळे केवळ ऊर्जा उत्पादनास गती मिळणार नाही, तर 1008...
मुंबई लोकल ट्रेन सेवा विस्कळीत: पायाभूत सुधारणा कामांमुळे मध्य आणि पश्चिम मार्गांवर विलंब
मुंबई: शहरातील लाखो लोकांचे जीवनमान असलेल्या लोकल ट्रेन सेवांमध्ये सध्या मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गांवर सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या सुधारणा कामांमुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार, हे काम पुढील काही दिवसांपर्यंत सुरू राहणार आहे, त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मध्य आणि पश्चिम मार्गावरील ट्रेन सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना...













