Home Breaking News मानवतेचा आदर्श ठरलेली जान्हवी! मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹2.50 लाखांची देणगी

मानवतेचा आदर्श ठरलेली जान्हवी! मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹2.50 लाखांची देणगी

46
0
मुंबई : सामाजिक भान आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी याचे उत्तम उदाहरण ठरवत जान्हवी सुधाकर यांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी ₹2.50 लाखांचा धनादेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. मुंबईत आयोजित छोटेखानी समारंभात ही देणगी प्रदान करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जान्हवी यांचे मन:पूर्वक आभार मानत त्यांच्या या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. “संकटकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधी गरजूंना दिलासा देतो. अशा निधीसाठी तुमच्यासारख्या सुजाण नागरिकांनी पुढे येणे ही समाजातील संवेदनशीलतेची निशाणी आहे,” असे ते म्हणाले.
जान्हवी सुधाकर यांनी सांगितले की, “समाजाने आपल्याला खूप काही दिलं आहे. ही देणगी म्हणजे समाजाला परत देण्याचा एक लहानसा प्रयत्न आहे.”
या भेटीत मुख्यमंत्री आणि जान्हवी यांच्यात समाजकारण, मदतकार्य आणि तरुणांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग का घ्यावा, याविषयी सखोल चर्चा झाली.
या उदात्त कृतीमुळे इतर तरुणांना देखील प्रेरणा मिळेल, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अशा प्रकारे नागरिकांचा सहभाग वाढत असल्याने शासनाला गरजूंपर्यंत प्रभावी मदत पोहोचवणे शक्य होत आहे.
🔹 जान्हवी सुधाकर यांचा स्तुत्य उपक्रम
🔹 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देणगी स्वीकृती; समाजासाठी प्रेरणादायी पाऊल
🔹 तरुण पिढीकडून सामाजिक जाणिवेचं सुंदर उदाहरण