Breaking News
यशाचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर अथक परिश्रम करा-प्रा.नितीन बानुगडे – “आयआयबी” तर्फे आयोजित मार्गदर्शन मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
यशाचे रहस्य म्हणजे मागे हटणे नाही आणि अथक परिश्रम करणे आणि जर तुम्ही त्याचे पालन केले तर डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिक बनण्याचा तुमचा दृढनिश्चय सार्थकी लागेल. “तुम्ही कोण आहात, यापेक्षा कोण होणार आहात, याचा विचार करा. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि चांगले मार्गदर्शन घेण्यावर भर द्या. जितके जास्त कष्ट घ्याल, तितकेच मोठे यश मिळते. कुठलेही काम लहान, अवघड नसते. मनातून...
पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई! अपहरणाचा कट उधळला, मुख्य आरोपीसह तीन जणांना अटक
पुणे, ३ एप्रिल २०२५:पुणे शहरातील कोंढवा भागात एका व्यक्तीच्या अपहरणाचा कट गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने उधळून लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी अपहरण झालेल्या व्यक्तीला सुखरूप सोडवून मुख्य आरोपीसह तीन जणांना ताब्यात घेतले आहे. अपहरणाचा थरार: 📌 १ एप्रिल २०२५ रोजी कॉलर नामे फिर्यादी (रा. कोंढवा, पुणे) याने पोलिसांना कळवले की, त्यांचे वडील (वय ४३) यांना दोन इसमांनी जबरदस्तीने गाडीत...
पुणेकरांनो लक्ष द्या! भिडे पूल तब्बल दीड महिन्यासाठी बंद – वाहनचालकांसाठी वाहतुकीचा मोठा बदल, पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर
पुणे मेट्रो कामासाठी ऐतिहासिक भिडे पूल वाहतुकीसाठी बंद – वाहनचालकांसाठी आव्हान निर्माण, प्रशासनाने केले पर्यायी मार्गाचे नियोजन पुणे | २१ एप्रिल २०२५ – पुणे शहरातील ऐतिहासिक आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भिडे पूल आजपासून तब्बल दीड महिन्यांसाठी बंद करण्यात आला आहे. पुणे मेट्रोच्या डेक्कन स्थानकाजवळील पादचारी पुलाच्या कामासाठी हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे डेक्कन, कर्वे रस्ता, नारायण पेठ,...
नागपूरमधील लीज प्रॉपर्टीज फ्री-होल्ड करण्याबाबत विचार करणार – मंत्री शंभूराज देसाई
नागपूर, दि. 15 : नागपूर महानगरपालिका व सुधार प्राधिकरणाच्या भाडेपट्ट्याने दिलेल्या मालमत्तांबाबतचे करार संबंधित अटी-शर्तींनुसार सुरू आहेत. मात्र या मालमत्ता फ्री-होल्ड करून भूखंडधारक किंवा मालमत्ताधारकांना देण्याबाबतचा प्रस्ताव नुकताच प्राप्त झाला असल्याने तो तातडीने तपासण्यात येईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्राधिकरणामार्फत भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंड व मालमत्तांबाबत विधानसभा सदस्य प्रवीण दटके यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे मुद्दा उपस्थित...
पुणे पोलिसांची मोठी कारवाई: १२ लाखांहून अधिक किंमतीचा मॅफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त; फरासखाना हद्दीत कारवाई
पुणे :- पुणे शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत एक मोठी आणि यशस्वी कारवाई अंमलात आणली आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. २ ने एकूण १२,१२,३६० रुपये किंमतीचा सुमारे ५९.४०० ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा घातक अंमली पदार्थ जप्त करत एक व्यक्तीला अटक केली आहे. ही कारवाई फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवार पेठ, बाटा बोळ, लक्ष्मी रोड परिसरात पार...
न्यायालयातील वकिलांच्या युक्तीवादावर चित्रा वाघ यांचा संतापाचा स्फोट! | वैष्णवी हगवणे प्रकरण तापलं | आरोपींना फाशीची मागणी जोरात
पुणे: वैष्णवी हगवणे हत्या प्रकरण पुन्हा एकदा चांगलंच गाजू लागलं आहे. या प्रकरणातील आरोपींच्या बाजूने न्यायालयात मांडण्यात आलेल्या अजब वकिली युक्तीवादामुळे वातावरण पुन्हा पेटलं आहे. या युक्तीवादावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या रोखठोक शैलीत संताप व्यक्त केला आहे. चित्रा वाघ यांनी थेट ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं आहे की, “पोरीला हालहाल करून मारून टाकलंत… अजून मन नाही भरलं...
मराठा आरक्षण लढ्याला नवी ऊर्जा – अंतरवली सराठी येथे छत्रपती शिवरायांचा रथ दाखल, २९ ऑगस्टला मुंबई वारीत पेटणार क्रांतीची ज्योत
जालना / अंतरवली सराठी : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला ऐतिहासिक उर्जा मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रथ सोमवारी अंतरवली सराठी येथे दाखल होताच संपूर्ण परिसरात जल्लोष उसळला. हजारो कार्यकर्त्यांच्या जयघोषात वातावरण दुमदुमले आणि आंदोलनाला नवा जोम मिळाला. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या चळवळीला रथाच्या आगमनामुळे ऐतिहासिक परंपरेचा वारसा लाभल्याचे मानले जात आहे. “हा रथ म्हणजे केवळ प्रतिक नाही,...
बागेश्वरधाम महाराष्ट्र सेवा समिती आणि रिक्षा संघटनेकडून भव्य श्रीराम जन्मोत्सव सोहळा!
पुणे:- पुण्यात बागेश्वरधाम महाराष्ट्र सेवा समिती आणि रिक्षा संघटनेच्या वतीने अत्यंत भव्य आणि भक्तीमय वातावरणात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यात हजारो रामभक्तांनी सहभाग घेतला असून, संपूर्ण परिसर श्रीरामाच्या जयघोषांनी दुमदुमून गेला. रामनामाचा जयघोष आणि भक्तीमय वातावरण श्रीराम नवमीच्या निमित्ताने बागेश्वरधाम महाराजांचे भक्त आणि रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा...
पुण्यातून फरार झालेला विश्वासघातकी चालक अखेर गजाआड! सव्वा पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे, ३० जुलै २०२५: पुणे शहरातील काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका विश्वासघातकी चालकाने मालकाच्या कामासाठी आणलेली पगाराची रक्कम चोरून पोबारा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. मात्र, पोलिसांनी चाणाक्ष तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी सलमान यासीन पठाण (वय ३२, रा. ठाणे) याला अखेर ठाण्यातून अटक केली आहे. काय घडलं होतं? फिर्यादीच्या गाडीतून मजुरांचा पगार देण्यासाठी १५ लाखांहून अधिक रोख रक्कम...
पुण्यातील बाणेरमध्ये स्पावर पुणे पोलिसांचा छापा; तीन महिलांची सुटका, व्यवस्थापक अटकेत, वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश!.
पुणे, ५ डिसेंबर २०२४ – पुणे शहर गुन्हे शाखेने ३ डिसेंबर रोजी बाणेर येथील एका स्पावर छापा टाकून वेश्याव्यवसाय चालवल्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली असून व्यवस्थापकासह एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही धडक कारवाई बाणेर रोडवरील बापूसाहेब मुरकुटे पाटील कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या ‘मून थाई स्पा’ या केंद्रावर करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकाराची...














