Home Breaking News मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वित्झर्लंडमध्ये जल्लोषपूर्ण स्वागत!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वित्झर्लंडमध्ये जल्लोषपूर्ण स्वागत!

112
0
झ्युरिक, स्वित्झर्लंड येथे बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मराठी बंधु-भगिनींच्या या प्रेमळ स्वागताने मुख्यमंत्री फडणवीस भारावून गेले आणि आपल्या भाषणातून त्यांनी मराठी अस्मितेचा गौरव केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठी बंधु-भगिनींचे प्रेम अनमोल आहे, मला या प्रेमातच कायम राहायचे आहे!” त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, महाराष्ट्र भारताचे “पॉवर हाऊस” आहे आणि येत्या काही वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था उपराष्ट्रीय स्तरावर ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनणार आहे.
फडणवीस यांनी महाराष्ट्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डेटा सेंटर कॅपिटल म्हणून राज्याच्या प्रगतीबाबत माहिती दिली. “आम्ही महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटी उभारणार असून जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्राचा ठसा उमटवणार आहोत,” असे ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “छत्रपतींनी आपल्याला देव, देश, धर्माकरता लढायला शिकवले. आपल्या संस्कृतीचा आणि भाषेचा अभिमान बाळगायला शिकवले, ती शिकवण मराठी माणसाने स्वित्झर्लंडमध्येही जपली आहे.”
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले, “मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठीला ज्ञानभाषा म्हणून प्रस्थापित करणे हे आमचे ध्येय आहे.”
यावेळी बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अमोल सावरकर, सेक्रेटरी किर्तीताई गद्रे, महेश बिरादार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडच्या कार्याचे कौतुक केले आणि मराठी बंधु-भगिनींना जागतिक स्तरावर मराठीचा अभिमान जपण्यासाठी प्रोत्साहित केले.
मुख्य आकर्षण:
  • मराठी संस्कृती आणि अस्मितेचा गौरव.
  • महाराष्ट्राची जागतिक अर्थव्यवस्थेत प्रगती.
  • इनोव्हेशन सिटी आणि तंत्रज्ञानातील आघाडीची योजना.
  • मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा अभिमान.